गडचांदूर प्रती. कोरपना नगरपंचायत ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक येत्या एकवीस डिसेंबर ला होणार आहे त्यासाठी आजी माझी आमदारांनी कंबर कसली असून आपली आपली टाकत आजमावत आहे.विशेष म्हणजे येथे काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष युती करून मैदानात उभे आहे या युतीत भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,शेतकरी संघटना मिळून युती केली आहे. अर्ज छाननी अंती पस्तीस उमेदवार होते त्यातून प्रभाग 5,7,9,12,17 मधे प्रत्येकी एक v प्रभाग 7 मधे दोन असे आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.
आता 35 पैकी आठ ने माघार घेतल्याने आता अठ्ठावीस उमेदवार आपले आपले नशीब आजमवणार आहे. 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मधे एक,दोन व सतरा या प्रभागात ओबीसी उमेदवाराची निवडणूक स्थगित झाल्याने आता सतरा पैकी चौदा प्रभागात निवडणूक होणार आहे. यात विद्यमान आमदार सुभाष धोटे काँग्रेस,याचे विरोधात संघटनेचे माजी आमदार ऍड वामनराव चटप,भाजप चे एड संजय धोटे,माझी आमदार सुदर्शन निमकर याच्यात सरळ लढत असून येथे मागील चाळीस वर्ष पासून काँग्रेस चे विजय बावणे याचे एक हाती सत्ता असून मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी 14 उमेदवार निवडून आणून काँग्रेस ची सत्ता काबीज केली होती हे विशेष