वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्याकडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी
गडचांदूर – चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्याकडे केली आहे,तसेच त्यांनी सदर मागणी
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करून सदर राष्ट्रीय महामार्ग मंजूर करावा अशी मागणी केलेली आहे.
कोरपना ते वणी हा ४२ किलोमीटरचा मार्ग आहे. यातील वणी ते चारगाव चौकी पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. परंतु चारगाव चौकी ते कोरपना हा ३२ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो आहे. अलीकडेच वरोरा ते वणी राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हा महामार्ग कोरपना पर्यंत थेट जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गाला सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. हा महामार्ग झाल्यास कोरपना व वणी परिसरातील सिमेंट , कोळसा , जिनिंग प्रेसिंग, गीटी खदान च्या जड वाहतुकीसाठी व दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास करण्यासाठी सोयीचा होईल. शिवाय कोरपना पासून नागपूर पर्यंतच्या प्रवासासाठी ही हा मार्ग सोयीस्कर होईल.
तसेच सदर रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून नागरिकांना राट्यावरून ये-जा करतना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच रत्याच्या बाजूच्या शेतातील पिकांनासुद्धा धुळीचा फटका बसत आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे तसेच कोरपना ते वणी मार्गावरील दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा आरोग्याचा फटका बसत आहे तसेच अनेक नागरिकांना पाठीच्या मणक्याच्या त्रास होत आहे,
कोरपना ते वणी राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग करून चौपदरीकरण करणे अत्यावश्यक आहे त्याकरिता आपण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण मागणी रेटून धरून पाठपुरावा करू असे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी सांगितले.