एकतेचा प्रतीक हिंदू-मुस्लीम युवकांनी रक्तदान करून दिला एकतेचा पैगाम. गडचांदुर प्रती.मो.रफिक शेख – इस्लाम धर्माचे प्रेषित संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती उत्सव निमित्त जामा मजीद कमिटी यांनी नियाज फातेखानी रॅलीचे आयोजन करून सरकार की आमद मरहब्बा घोषणेने वातावरण दुमदुमले यावेळी कोमी एकता मंच स्टुडन्ट फोरम ग्रुप यांनी मौलाना शेरखान कमिटीचे अध्यक्ष असरार अली नवाज शेख यांचे सत्कार व स्वागत केले या ठिकाणी पैगंबर मोहम्मद यांनी दिलेला संदेश प्रेम सद्भावना यामुळे समाजामध्ये भाईचारा व एकमेकाला मदतीच्या भावनेतून स्नेह निर्माण होतो आणि पैगंबरांनी दिलेला संदेश हा मानव जातीला योग्य संस्कार सन्मान व योग्य दिशेने जाण्याचा मार्ग दाखवितो यानिमित्त या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोठ्या संख्येने युवकांनी भाग घेऊन रक्तदान केले काही ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली यामधून एकतेचा संदेश दिसून आला सोहेल अली अनिल देरकर शारीक अली एडवोकेट मुसळे शहबाज अली अभिषेक तुरणकर मोबीन बेग अमोल लोडे लतीफ शेख पवन बुरेवार नदीम शेख रितिक बोरडे मोहब्बत खान अजय झाडे साजिद अली इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी झालेल्या सभेत मौलाना शेरखान सामाजिक कार्यकर्ते आबीद अली इस्माईल शेख यांनी पैगंबर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून माणुसकी हा धर्म आहे मानवतेसाठी दिलेले संदेश आत्मसात आज करण्याची गरज असल्याचे अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले जिल्हा सामान्य रुग्णालयाची समूह या ठिकाणी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात मोलाचं सहकार्य केलं पोलीस बंदोबस्त ठाणेदार ढाकणे यांचे मार्गदर्शन चोख होता कार्यक्रमाचे संचालन सोहेल अली तर आभार कृपाल कोल्हे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने युवक बाल गोपाल प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रक् दानत कर्णार्यात बन्सीलाल कुडवले,गणेश वाघ, फैयाज उर रहमान, तोसिफ शेख,अंशुल पोतणुरवार,मनोहर चन्ने, ठावरी सर,फरहान शेख,नादिर रमजान फैजान, स ह पन्नास पेक्षा जास्त रक्त दात्यानी रक्तदान केले. गडचांदुर येथे सुद्धा कोविड 19चे नियम पाळून इद साजरी करण्यात आली रजा मस्जिद येथे ईशा ची नमाज नंतर मोहंमद पैगंबर यांचेवर आधारित प्रवचन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे फल जिजामाता बाल वसतिगृह व भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा येथे मुलांना भोजन, फल वितरीत करण्यात आले मदिना मस्जिद येथे बशरुद्दिन मौलाना वणी याचे प्रवचन झाले .रजा मस्जिद येथे हाफिज हसनैन रजा,वणी येथील कोनैन रजा नातखा याचे नात प्रसिद्ध करण्यात आले यासाठी दोन्ही मस्जिद येथील युवा कमिटी ने अथक परिश्रम घेतले