ब्रम्हपुरी : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्ष्या निमित्य साजऱ्या होत असलेल्या सुवर्ण महोत्सव व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सीआरपीएफच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल रॅली १२ ऑक्टो ला गडचिरोली वरून निघून १००० किलो.चा प्रवास करून २६ ऑक्टो .ला गुजरात राज्यातील केवडिया येथे समाप्त होईल.यावेळी मार्गातील मोठ्या शहरांमध्ये रॅलीचे स्वागत केले जाईल.
भारताला स्वतंत्र मिळण्यापूर्वीचा संघर्ष आणि आज स्वतंत्र्यं मिळाल्यावर त्याचे महत्व काय ? हा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सशक्त भारत ,समृद्ध भारत निर्माण करून देश प्रेमाची भावना जनतेत निर्माण करणे हा रॅलीचा मुख्य उद्धेश आहे.ही रॅली केवडिया गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टेचू ऑफ युनिटी येथे श्रद्धांजली अर्पण केल्यानन्तर समारोप होईल.

या सायकल रॅलीस गडचिरोली येथून महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी हिरवी झेंडी दाखवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यावर दुपारी ४वाजता ही रॅली ब्रम्हपुरी येथे लोधिया सभागृहात स्वागत करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा रीता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, वड सा येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, नगरसेविका नीलिमा सावरकर, लता ठाकूर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलीत करून व सखी मंच यांनी गणेश वंदना झाल्यावर सायकल रॅलीत भाग घेतलेल्यांच्या गळ्यात माळा घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी १९१ बटालीयनचे कंमोडन्ट शैलेंद्र कुमार यांनी या रॅलीच्या आयोजना मागची सविस्तर भूमिका विशद केली.सदर कार्यक्रमास
.श्री शैलेंद्र कुमार कमांडन्ट 191 बटा,डा सी शैलेंद्र सी एम ओ, श्री मुकेश कुमार सिंह, आलोक अवस्ती, श्री संजय मरवान Dy comdt, सलमान खान AC, श्री चेतन AC, श्री मिलिंद शिंदे एस डी पी ओ ब्रम्हपुरी, सखी मंच सदस्या ,ख्रिस्थानन्द विद्यालयाचे विद्यार्थी , सीआरपीएफचे जवान ,शहरातील मान्यवर पाहुणे ,पत्रकार उपस्थित होते.