सिंदेवाही–
कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्यात आला. भारतातील शेतकऱ्याला बळीराजा, अन्नदाता असे ही संबोधले जाते. या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी 23 डिसेंबर या दिवशी किसान दिवस साजरा केला जातो.

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिनी किसान दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.व्ही.जी.नागदेवते,कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही होते. उद्घाटक म्हणून सौ.माधुरीताई हाडकेकर लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.विजय सिडाम यांनी केले यामध्ये राष्ट्रीय किसान दिवसाची संकल्पना व उद्दिष्टे, गट शेतीचे महत्व याविषयी ,डॉ.सोनाली लोखंडे यांनी मानवी आहारामधील पोषण मूल्य चे महत्व याविषयी आणि प्रा.प्रवीण देशपांडे यांनी रब्बी हंगाम मधील एकात्मिक किड नियोजन विषयी माहिती सांगितली.अध्यक्ष मार्गदर्शना मध्ये डॉ.व्ही.जी.नागदेवते यांनी रब्बी पिकांमधील एकात्मिक पीक नियोजन,खत व्यवस्थापन तसेच पारंपारिक शेतीला विज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले या कार्यक्रमासाठी शिंदेवाही तालुक्यातील शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय सिडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुमित डोंगरवार ,श्री सुयोग तिवाडे , श्री. सुशांत दबोले श्री.नीलकमल बारसागडे, श्री वैजनाथ माने यांचे सहकार्य लाभले.