गडचांदूर,,(ता,प्र,)
विद्यानगरी,गडचांदूर येथील रहिवासी व सध्या जिल्हा परिषद हायस्कूल,विहिरगाव येथील कार्यरत सहाय्यक शिक्षक किशोर बबनराव निर यांना शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्द्ल त्यांचा गौरव करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री ना,विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते किशोर निर व त्यांच्या पत्नी सौ,अमृता (शिक्षिका,महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर)यांचा शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र, व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले,
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ, संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार,सभापती नागराज गेडाम,सुनील उरकुडे,रोशनी खान,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, मिताली सेठी,माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, उपस्थित होते,
श्री किशोर निर,जिल्हा परिषद हायस्कूल ,विहिरगाव 20 सप्टेंबर2019 पासून कार्यरत असून त्यांनी शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले, राष्ट्रीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे,
किशोर निर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक हितचिंतकानी अभिनंदन केले आहेत,