Friday, September 6, 2024
Homeचंद्रपुरकला-वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

कला-वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

आशिष निमगडे, गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी /- विद्याभारती शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचलित गोंडपिपरीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्याभारती शिक्षण मंडळाचे सचिव दीपक गुंठेवार यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा ध्यानात घेत अशा प्रकारे रक्तदान शिबिराच्या आयोजन करून महाविद्यालयाने आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात अजूनही अनेक शंका आहे त्या शंकांची निरसन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून समाजातील मोठा वर्ग अजूनही रक्तदानापासून दूर आहे आणि रक्तदान करावे असे आवाहन मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी माजी बाजार समिती सभापती रजिवसिह चंदेल,प्रा,तावाडे, प्रा खाडे,प्रा ढवळे,प्रा सहारे,प्रा चव्हाण ,प्रा वीरुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024