◆ जागतिक मानवाधिकार संघटना, हैद्राबाद मार्फत विशेष कार्याची दखल
ब्रह्मपुरी
जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे दि.१० डिसेंबर रोजी तेलंगणा राज्यातील जागतिक मानवाधिकार संघटना, हैद्राबाद ह्या संस्थेमार्फत आपल्या भारतातील पर्यावरण, शिक्षण आरोग्य, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अश्या अनेक क्षेत्रात मानवहिताचे कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतो.
ह्यावर्षी सुद्धा ह्या संस्थेमार्फत “सेवा भारत अवॉर्ड” ह्या राष्ट्रीय पूरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्याचे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष के.एम.सुब्बा रेड्डी यांनी ठरविले, आणि भारतातील सर्व क्षेत्रातील लोकांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पर्यंत नामांकन पाठविण्याचे आव्हान केलेले होते.
भारतातील सर्व राज्यातून जवळपास ५००० पेक्षा जास्त लोकांनी संस्थेला नामांकन पाठविले होते. संस्थेतील निवड समितीच्या शिष्टमंडळाने सर्व क्षेत्रातून आलेल्या नामांकनातून काही विशेष बाबी असलेल्या फक्त १२० गुणिजन व्यक्तींची निवड करून, त्यांना मोठ्या सत्कार समारंभास बोलवून त्यांना गौरविण्यात आले.
सदर पुरस्कारासाठी ब्रम्हपुरी येथील उदयकुमार पगाडे ह्यांची सामाजिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी निवड करण्यात आली, आणि त्यांना आज १० डिसेंबर २०२१ रोजी गुरुवारला तेलंगणा राज्यातील नेल्लोर येथील पुरस्कार सोहळ्यात आमदार श्रीधर रेड्डी, न्यायाधीश श्रीनिवास नायक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते “सेवा भारत अवॉर्ड-२०२१” हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रातून फक्त ५ लोकांची ह्या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यामध्ये उदयकुमार पगाडे (२७) हे सर्वात कमी वयाचे पुरस्कार्थी ठरलेले आहेत. यांनी मागील काही वर्षांमध्ये केलेल्या सामाजिक उपक्रम, त्यांच्यातील युवा कौशल्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि कणखर कार्यपद्धती बघून निवड समितीने ह्यांची दखल घेत, ह्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे, हेच विशेष