सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश
मृत्युंजय रामटेके
सावली – आसोलामेंढा मुख्य नहर व उपकलवा चे लायनिंग चे काम गेल्या दोन वर्षपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र नागरिकांना नहराला पायऱ्या नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या काठचा माणूस त्या काठी जाता येत नव्हते. नहरात जनावरे पडल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत होती या सर्व समस्यांचा विचार करून सावली तालुका काँग्रेस कमिटीने ठिकठिकाणी पायऱ्या व धुणेघाट चे निर्माण करावेत अशी मागणी पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकळे केली होती. सदर मागणीला आता यश आले असून ठिकठिकाणी धुणेघाट व पायऱ्या बांधण्यात येतील असे पत्र यासंबंधात सावली तालुका काँग्रेस कमेटीला प्राप्त झाले आहे.

यासंबंधात सविस्तर वृत्त असे की, असोला मेंढा मुख्य नहराला ठिकठिकाणी पायऱ्या व धुणेघाट देणे आवश्यक होते मात्र अंदाजपत्रकात पायऱ्यांची तरतूद नाही अशी बाब पुठे करून अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी पायऱ्या देण्यास टाळाटाळ केली होती दरम्यान ठिकठिकाणी पायऱ्या देणार नसाल तर काम बंद करण्यात येईल अशी भूमिका हिरापूर परिसरातील नागरिकांनी घेतली होती. काही काळ काम बंद करण्यात आले होते.
नागरिकांनी सदर बाब पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकळे निवेदनाद्वारे लक्ष्यात आणून दिली होती पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी अंदाजपत्रकात पायऱ्या व धुणेघाट चा समावेश करावा अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या
दरम्यान अधीक्षक अभियंता गोसिखुर्द प्रकल्प मंडळ नागपूर यांच्या दिनांक जा. क्र.345/गोप्रमं/रेशा3/धा क्र/लोप्रति/18/13/2021 दिनांक9/9/2021 च्या पत्रानुसार गोसिखुर्द चे कालव्याचे लायनिंग चे काम करतांना पायऱ्या व धुणेघाट चे ठिकठिकाणी बांधकाम करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना या बाबीमुळे दिलासा मिडला असून भविष्यात पायऱ्या व धुणेघाट निर्माण होणार आहे.
यावर्षी असोला मेंढा नहरात मनुष्य हानी झाली होती. त्यासोबतच जनावरे, रानटी जनावरे, यांचाही मृत्यू झाला होता. लायनिंग ला काई बसल्यामुळे वर चढण्यासाठी अडचण निर्माण होत होती. नहरात पडलेल्या जनावरांना काठायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. आता अधीक्षक अभियंता गोसिखुर्द प्रकल्प मंडळ नागपूर यांच्या पत्रामुळे नागरिकांना दिलासा मिडला असून सावली तालुका कॉंग्रेस कमिटीने केलेल्या पाठपुरवठ्याला यश आले असून पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचे नागरिकांनी आभार मानले आहे