गडचांदूर पोलिसांची कारवाई
गडचांदुर! मो.रफिक शेख –

गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आवारपूर दूध डेरी या परिसरात मुख्य रस्त्याला लागून असलेल्या राजकुमार पुरके यांच्या घरात परिसरातील जुगार खेळणारे ठिय्या मांडून असल्याची गोपनीय माहिती नांदा फाटा चौकी येथे कार्यरत असलेले पोलिस जमादार सुनील मेश्राम नागोबा बुरान संदीप अडकिने यांना लागताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जुगार खेळत असलेल्या ठिकाणावर ती छापा टाकला यात मंगेश यादव अवताडे सांगोला, प्रदीप पिलास राजूरकर बीबी , कैलास दादा जितक सांडे नांदा, अनिल रमेश कोकण वार नांदा फाटा , विनोद पांडुरंग निखाडे अनमोल महादेव वनकर , दोघे राहणार नांदगाव सूर्याचा रामाजी चिंचोलकर नांदा अशा आठ जणांचा समावेश असून त्यांच्यावर ती, मुंबई जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे मात्र अशाच प्रकारच्या जुगाराचे व्यवसाय या परिसरात सट्टा बाजार अनेकांनी सुरू केल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे