ब्रम्हपुरी :-
ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेर-नवरगाव गावातील वैनगंगा नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शुक्रवार रोजी सकाळी ११:३० वाजता ब्रम्हपुरी आम आदमी पार्टी कडून धडक कारवाई केली. महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर व एक ते दीड ब्रास वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,अर्हेर-नवरगाव नदीपात्राातून वाळूचे उत्खनन करुन त्याची ब्रम्हपुरी रोडने अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती अर्हेर-नवरगाव येथील स्थानिक आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळाली.त्यांनी आपल्या वरिष्ठ नेते असलेले आम आदमी पार्टीचे विधानसभा अध्यक्ष नावेदभाऊ खान यांना सूचना दिली व त्यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात संपर्क केला असता तिथून सहकार्य मिळत नसल्याने पोलीस मदत केंद्र ११२ क्रमांकावर संपर्क केला. पोलीस विभागाची तातडीने मदत मिळाली तर परिसरात ब्रम्हपुरीचे मंडळ अधिकारी सुद्धा असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना संपर्क साधतं पाचारण करण्यात आले तेव्हा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अर्हेर-नवरगाव नदीपात्रातून रेती वाहतूक करणाऱ्या वीना क्रमांकाच्या एका ट्रॅक्टरला अडवून परवानगी बाबत विचारणी केली असता. ट्रॅक्टर वाहकाकडे कुठलीही परवानगी नसल्याची खात्री पोलीस विभाग व महसूल विभागाला झाल्याने सदर ट्रॅक्टरवर दिनांक ०१/०९/२०२३ शुक्रवार रोजी सकाळी ११:३० वाजता कायदेशीर कारवाई करण्यात आली. अवैध रेती चोरी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचे नाव सुरज राऊत रा.अर्हेर-नवरगाव ट्रॅक्टर मालकाचे नाव आदित्य चंद्रलाल मिसार रा. कन्हाळगाव असे जप्तीनाम्यात नमूद करण्यात आले. महसूल विभागाने ट्रॉलीसह ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टरमधील वाळू जप्त केली आहे.
अर्हेर-नवरगाव नदीपात्रातून अवैध रेतीचोरीचे प्रमाण अधिक असल्याने नागरिक त्रस्त असून नागरिकांना होणाऱ्या समस्येबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केले जात आहे.