— खासदार बाळुभाऊ धानोरकर.
गडचांदूर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन.
गडचांदुर :मो.रफिक शेख– आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे रक्तदान शिबिर मोतीबिंदू शिबिर, ज्येष्ठ नागरिकांना सेवा कार्ड, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, इ- सातबारा चे वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, आमदार सुभाष धोटे हे विकासाचं व्हिजन असणारं नेतृत्व आहे. सामाजिक, राजकीय व अन्य अनेक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. कोरोणाच्या संकट काळात सुद्धा सर्वांना सोबत घेऊन त्यांनी मदत व सेवा कार्य केले. क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी निरंतर कष्ट उपसले आहेत. कार्यकर्त्यांशी, क्षेत्रातील गोरगरीब जनतेशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित आहेत. त्यामुळेच राजुरा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. तर सत्काराला उत्तर देताना आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रेम, जिव्हाळा आणि सहकार्याने आणि समस्त जनतेच्या आशिर्वादानेच आपण यशस्वी होऊ शकलो आहोत. आयुष्यभर जनसेवेसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करीत राहणार अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख पाहुणे आमदार प्रतिभाताई धानोरकर, महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव विनोद दत्तात्रेय, राजुराचे नगराध्यक्ष अरूण धोटे, गडचांदूर चे नगराध्यक्ष सविता टेकाम, काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, जिवती अध्यक्ष गणपत आडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवा राव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, बाळासाहेब मोहितकर, नामदेव येरणे, हंसराज चौधरी, सुग्रीव गोतावळे, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, पापय्या पोन्नमवार, नोगराज मंगरूळकर, गटनेते विक्रम येरणे आशिष देरकर, उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, नगरसेविका अर्चना वांढरे, कल्पना निमजे, राहुल उमरे, अरविंद मेश्राम, सतीश बेतावार, जयश्री ताकसांडे, अश्विनी कांबळे शिवकुमार राठी, रोहीत सिंगाडे, अतुल गोरे, रुपेश चुदरी, विलास मडावी, चेतन शेंडे, राहुल थेरे, तुकाराम चिकटे, अल्ताफ शेख, कंटु कोटनाके, यासह अनेकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन आशिष वांढरे यांनी केले. प्रास्ताविक संतोष महाडोळे यांनी तर आभार प्रदर्शन गटनेते विक्रम येरणे यांनी मानले. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.