नांदाफाटा येथील युवकांचा पुढाकार
गडचांदुर .मो.रफिक शेख –
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदा बिबि आवारपुर शहर काँग्रेस कमिटी व नांदा यवक मित्रांनी १० ऑक्टोंबर रोजी नांदाफाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते १६१ नागरिकांनी रक्तदान करून आमदार सुभाष धोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला आमदार सुभाष धोटे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रक्तदान शिबीराला भेट दिली मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा भव्य सत्कार करण्यात आला
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औद्योगिक नगरी नांदा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते परिसरातील युवकांसह नागरिकांनी रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन १६१ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून आमदार सुभाष धोटे यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट दिली सतीश जमदाडे , महेश राऊत , कल्पतरू कन्नाके , ओंकेश गोंडे , संजय नित , विजय ढवस , कुणाल खेडेकर , प्रितम मेश्राम , डाॅ.स्वप्नेश चांदेकर , अभय मुनोत यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अथक परिश्रम घेतले चंद्रपूर रक्तपेढीचे अधिकारी
जय पचारे पंकज पवार ,
रुपेश घुमे , साहील भसारकर , आशीष काबंळे यांनी अत्यंत व्यवस्थितपणे रक्तसंकलन करून घेतले कोरपना तालुका आरोग्य विभागाचे डाॅ.चंदनखेडे व त्यांच्या संपूर्ण चमूने रक्तदान शिबिरात मदत कार्य केले नांदा शहर कॉँग्रेस कमिटीतर्फे आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला