(यांचे मूल येथील गोंडियन समाजाच्या वतीने १०,१२ व पदवी पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यातील प्रमुख मार्गदर्शन)
ब्रह्मपुरी…
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्यामधील आंतरिक शक्तींना ओळखण्याची गरज आहे. असे नाही की, आपल्यात इतर विद्यार्थ्यांच्या तूलनेत गुणवत्ता नाही. खरी गरज आहे ती आपल्यातील सुप्त शक्तीना ओळखून त्या गुणांचा विकास करणे व कठीण परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे याकरिता जिद्द, चिकाटी, ध्येयनिश्चिती, वेळेचे नियोजन , स्वतः चे व्यवस्थापन, आत्मविश्वास व संयम ठेवून सातत्याने अभ्यास करण्याची गरज आहे. परिस्थिती जरी आर्थिक दृष्टीने अनुकूल नसेल तरी त्या परिस्थितीवर मात करता येतं परंतु मनात जिद्द व चिकाटी ठेवली पाहिजे तरच प्रशासकीय पदे प्राप्त करता येतात आज आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविणे व आपल्यामधील सुप्त शक्तीना ओळखण्याची खरी गरज आहे. यश तुमच्या पासून दूर नाही जवळ आहे परंतु स्पर्धा परीक्षांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलविणे गरजेचे आहे. असे मौलिक मार्गदर्शन प्रा डॉ प्रकाश वट्टी यांनी मूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासुदेव आत्राम केंद्रप्रमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ कांचनताई वरठे, सहायक अधीक्षक प्रशासकीय अधिकारी जि प चंद्रपूर, मा. कवठे सर, मंगी आश्रम शाळा, मा दिपक सेमस्कर व इतर मान्यवर,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ कांचनताई वरठे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांनी आपल्या करियरचे वाटा योग्य निवड करण्याचे मार्गदर्शन केले तर श्री कवठे सर,व दिपक सेमीस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा वासुदेव आत्राम सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून अपयश ही यशाची पायरी आहे असे प्रतिपादन करुन वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच याप्रसंगी १० , १२ व पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणजी कोवे तर सूत्रसंचालन श्री गुरुदेव कुळमेथे यांनी केले, अतिशय सुंदर उपक्रमशील कार्यक्रमाचे आयोजन पुरुष बचतगटाच्या वतीने करण्यात आले होते यात श्री मुरलीधर आत्राम, संपत कन्नाके,शालीक गेडाम, विलास आळे, मेजर नैताम, भोजराज कोरवते सर,व बहुसंख्येने गुणवंत विद्यार्थी महिला मातृशक्ती उपस्थित होते.