Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरअवैध रेती उपसा करणारा चालक ट्रॅक्टर सोडून फरार,पोलीस प्रशासनाची कारवाही

अवैध रेती उपसा करणारा चालक ट्रॅक्टर सोडून फरार,पोलीस प्रशासनाची कारवाही

सुनिल गेडाम, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही

सिंदेवाही/- सिंदेवाही तालुक्यातील रेती तस्कर वेगवेगळ्या योजना आखून अवैध गौण खनिज विना परवानगी ने उपसा करत आहे. ही गौण खनिजची तस्करी करताना कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडू नये व होणाऱ्या कारवाही पासून वाचण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली वर लक्ष ठेवाण्यासाठी टप्प्या टप्प्यावर आपले गुप्तचर ठेवत असतात त्या मुळे रेती तस्कर रात्री किंवा पहाटेच्या सुमारास नदी पात्रामधून बेकायदेशीर मार्गाने गौण खनिजचा उपसा करीत असतात. या अवैध गौण खनिज तस्कर च्या मुसक्या आवळन्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा पूर्ण पणे तयारीत असून पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी आपले सहकारी विनोद बावणे यांच्या सोबत सकाळच्या पट्रोलिंग दरम्यान मौजा विरव्हा गावातील नदी पात्रता नंबर नसलेले ट्रॅक्टर विना परवानगीने रेतीचा उपसा करीत होते पण पोलीस कर्मचारी दिसताच ट्रॅक्टर चालक व मजूर ट्रॅक्टर नदी पात्रतच ठेऊन पळाले,फिर्यादी स. फौ. विनोद बावणे ब.नं.१८९९ पोलीस स्टेशन सिंदेवाही यांच्या तक्रारी वरून अज्ञात वाहन चालक मालक यांच्या विरोधात सिंदेवाही पोलीस स्टेशनला गुन्हा अप -१५३/२०२४ कलम ३७९ भा. द.वी. कलम ५५/१७७
दाखल केला असून वाळू किंमत एक ब्रास ५००० रु व ट्रॅक्टर किंमत १०,०५००० रुपये चा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस प्रशासन च्या माध्यमातून होत असलेल्या कारवाही ने रेती तस्कर मध्ये धडकी भरली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular