Monday, May 27, 2024
Homeचंद्रपुरअल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धाना सन्मानित

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धाना सन्मानित

विदर्भ कल्याण गडचांदुर – मो.रफिक शेख – कोरोनाच्या महासंकटातून सावरण्याकरीता सरकार कडून भरपूर उपाययोजना करण्यात आल्या काही बंधने सुध्दा लावण्यात आले.


या सर्वांना यशस्वी करण्याकरिता आप- आपल्या स्तरावरती खूप मेहनत घेण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य स्तरावरती ऑंटीजेन टेस्ट, कोविड लसीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला. त्यांच्या या कार्याला बघून अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून तालुका वैद्यकीय अधिकारी कोरपना डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा डॉ. रामेश्र्वरजी बावणे व त्यांच्या अधीनस्त आसलेले सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर व इतर अशा एकूण 45 कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धां म्हणून सन्मान करण्यात आला. सन्मानात सर्टिफिकेट, गिफ्ट सोबतच सर्वांना मानाचे जेवण सुद्धा देण्यात आले. (पण)पत्रकार या कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड श्रीराम पी.एस., टेक्निकल हेड संदीप देशमुख, व्यवस्थापक कर्नल दिपक डे, आनंद पाठक, डॉ. बबीता नरुला, डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. रामेश्वरजी बावणे व सी.एस.आर. प्रमुख सतिष मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी युनिट हेड श्रीराम पी. एस. यांनी बोलतांनी सांगितले की, आपण सर्व कोरोना योद्धानी कोरोना काळात केलेले कार्य हे अप्रतिम आहेत, तुमच्या या कार्यास आम्ही सदैव सहकार्य करू. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अल्ट्राटेक चे उपाध्यक्ष संजय श्रर्मा आणि उपमहाव्यवस्थापक कर्नल दिपक डे यांचे मोलाचे योगदान राहिले. डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. रामेश्वरजी बावणे तसेच सर्व कोरोना युद्धानी अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे याप्रसंगी बोलतांनी सांगितले की तुम्ही आम्हा सर्वांचे सन्मान करून पुन्हा कोरोना योद्धा म्हणून कार्य करण्यास आमचे मनोबल वाढवले आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular