Friday, April 12, 2024
Homeचंद्रपुरअन् देवदुत बनुन आलेल्या ब्रम्हपुरी पोलिसांनी वाचविले त्या जखमी युवकाचे प्राण

अन् देवदुत बनुन आलेल्या ब्रम्हपुरी पोलिसांनी वाचविले त्या जखमी युवकाचे प्राण

ब्रम्हपुरी/

एक युवक आपल्या दुचाकीने स्वगावी जात असतांना रस्त्यावरून दुचाकी घसरल्याने युवक जखमी झाला. आणि तेव्हा देवदूत बनुन पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहचले. आणि पोलिसांनी त्या जखमी युवकाला रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या शासकीय चारचाकी वाहनातुन थेट रुग्णालयात पोहचवत त्या जखमी युवकाचे प्राण वाचविले. पोलिसांनी समयसूचकता व तत्परता दाखवून युवकाचे प्राण वाचविल्याबद्दल सर्वत्र त्या पोलीसांचे कौतुक केले जात आहे.


नागभीड तालुक्यातील पांजरेपार येथील आशीष रामटेके वय २४ वर्ष हा आरमोरी येथे काही कामानिमित्ताने गेला होता. आपले काम आटोपून १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपले स्वगावी जात असतांना ब्रम्हपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील बेटाळा फाट्याजवळ सदर युवकाची दुचाकी रस्त्यावरून घसरल्याने युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्यानंतर रस्त्याने जात असलेले नागरिक घटनास्थळी जखमीला बघत होते. मात्र कुणीही जखमीला रुग्णालयात दाखल करण्याची माणुसकी दाखवली नाही. मात्र तेवढ्यातच गस्तीवर असलेले ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथील पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलिस अंमलदार प्रकाश दुपारे हे त्या रस्त्यावरून जात असतांना नागरिकांचा जमाव दिसल्याने त्या ठिकाणी थांबले. व जखमी झालेला युवक नजरेस पडताच त्या युवकाच्या डोक्यातुन रक्त वाहत दिसल्याने त्यांनी प्रथमतः त्या युवकाच्या डोक्याला रुमाल बांधली. व रुग्णवाहिकेची वाट न बघता समयसुचकता व घटनेचे गांभीर्य बघुन पोलीस विभागाच्या शासकीय वाहनात सदर युवकाला बसवुन थेट त्यांनी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. व युवकाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधुन त्यांना घटनेविषयी माहीती दिली.
सध्या उपचारार्थ दाखल असलेल्या युवकाची प्रकृति स्थीर आहे.
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस अंमलदार प्रकाश दुपारे यांनी सदरची उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular