Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमद्यप्राशन करून नालीत पडल्याने मृत्यू

मद्यप्राशन करून नालीत पडल्याने मृत्यू

आर्वी : मद्यप्राशन करून नालीकाठावर बसलेल्या इसमाचा तोल जाऊन नालीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना येथील माहेशवरी मार्ग डागा मेडिकल गल्लीत घडल्याने खळबळ उडाली आहे रविवारी ता 25 ला दुपारी साडेचार वाजता ही घटना उघडकीस आली.


प्रेम रामकिसन चावरे वय 46 राहणार वाल्मिक वॉर्ड असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तो येथील नगरपालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता
डागा मेडिकलच्या या गल्लीत एक इसम लघुशंकेला गेला असता त्याला नालीत एक इसम उलटा पडलेला दिसून आल्याने त्यांनी आरडाओरडा केली असता परिसरातील लोकांची चांगलीच गर्दी झाली त्यातील काही लोकांनी त्याला ओळखले आणि नातेवाईकांना माहिती दिली याबाबत हा व्यक्ती या गल्लीत बसला होता दुपारची वेळ असल्याने आणि लोकडाऊन असल्याने लोक घराच्या बाहेर निघाले नाही त्यामुळे हा व्यक्ती केव्हा नालीत पडला? हे समजले नसल्याचे सांगितले

नातेवाइकांनी त्याला नालीतून बाहेर काढून आर्वी पोलिस ठाण्यात ही माहिती दिली असता पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केला आहे पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा तपास सुरू आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular