Friday, March 29, 2024
Homeभंडाराकोविड रुग्णालयात आग प्रतिबंधित प्रशिक्षण

कोविड रुग्णालयात आग प्रतिबंधित प्रशिक्षण

भंडारा:-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उष्णतेची तीव्रता पाहता आगीच्या घटना घडू नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयात आग प्रतिबंध व उपयोजनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.


राज्यातील काही ठिकाणी कोविड रुग्णालयाला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन कोविड रुग्णालयात असलेले डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय व इतर कर्मचाऱ्यांना आग प्रबंधात्मक उपाययोजना बाबत प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले.
आगी सारखी घटना घडल्यास संबंधित विभाग व संसाधने कसे प्रतिसाद देतात याबाबतीत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. उन्हाळा असल्यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने आग प्रतिबंधात्मक यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवावी अशा सूचना या प्रशिक्षणात देण्यात आल्या. यावेळी रंगीत तालीम करून दाखविण्यात आली. या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular