Monday, June 27, 2022
HomeUncategorizedभूतपूर्व माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

भूतपूर्व माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

आर्वी : भूतपूर्व व माजी सैनिक संघटना आर्वीच्या वतीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रम स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झाला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी साजरा केल्या जातो पण तसेच 2019 मध्ये कोरोना पार्श्वभूमीची गर्दी टाळण्याच्या हेतूने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून 30 जानेवारीला साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी श्री हरीश धार्मिक साहेब होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून पूर्व माजी सैनिक संघटनेचे तथा तिरंगा माझा संघटनेचे प्रणेते संदीप भाऊ रोंगे रा. (अमरावती) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ‘ये मेरे वतन के लोगो” या गीताने करण्यात आली एनसीसी कॅडर पथकाने संचलन करत पाहुण्यांचे आगमन केले. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभलेले माणिकराव मलिये, सुरेश राव ढोरे, प्रकाशराव जयसिंगपुरे, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री सुदामराव सरोदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे अध्यक्ष श्री सहदेवराव भगत यांनी केले. संघटनेच्या अध्यक्षांनी भूतपूर्व सैनिकांना देण्यात आलेली जमीन वर्ग 1 करण्यात यावी तसेच त्या अनुषंगाने काढण्यात आलेली शासकीय परिपत्रक रद्द करण्यात यावी अशी मागणी आपल्या भाषणात केली. तसेच संघटनेच्या अध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले माजी सैनिकांसाठी केंद्र शासन व राज्य शासन राबवित असलेल्या योजना शेवटच्या माजी सैनिक पर्यंत पोहोचविणे ही बाब लक्षात घेऊन आर्वी येथे माजी सैनिक संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगताना 26 जानेवारी 1950 व्या दिवसाने भारताचा इतिहास बदलून माणसाला माणूस म्हणून दैनंदिन जीवन जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, नोकरी या सारख्या सुविधा मिळण्याकरिता प्रत्येकांनी संविधान वाचणे हे आपले अधिकार व कर्तव्य आहे. असे सांगितले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता भूतपूर्व सैनिक श्री पुंडलिकराव गायनर पुरुषोत्तम नागपुरे श्रीमती सुलोचना पखाले, गोपाळराव जिचकार, मायाबाई हरेल, व अन्य सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular