Monday, June 27, 2022
Homeवर्धाकोरोणामुळे शेतकरी आंदोलन स्थगित

कोरोणामुळे शेतकरी आंदोलन स्थगित

133 दिवसापासुनचे अविरत शेतकरी आंदोलन
स्थगित जिल्हा समन्वय समितीने घेतला निर्णय !

वर्धा :
देशामधील,राज्यामधील व जिल्ह्यातील आरोग्याची कोरोना महामारी मुळे अतिशय बिकट परिस्थिति होत चालली आहे. कोरोना आजार सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणाने,आरोग्य सुविधांच्या अभावाने व लोकांच्या सुलभ संसर्गाने या गंभिर आजारात अनेकांचे मृत्यु होत आहे. त्यामुळे जिल्हा शेतकरी समन्वय समितीची सभा घेऊन काही काळासाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे आज सोमवारी बजाज चोकातील मंडप खाली करण्यात आला.

कोरोना आजार बाबत प्रसारमाध्यमांच्या मार्फत समाजमनात भितीदायक विचार सातत्याने वाढत आहे. प्रधानमन्त्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकार याकडे संपुर्ण दुर्लक्ष करून राज्यांच्या निवडणूकांमध्ये गुंग आहे. केंद्र सरकार ला आता देशामधील जनतेचे आरोग्य महत्वाचे वाटत नाही.

अशावेळी वर्धा येथील शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समितीचे 15 डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील 41 सामाजिक राजकीय संघटनांनी सुरू केलेले 130 दिवसांपासूनचे शेतकरी आंदोलन आपण पुढे न्यायचे की काही काळासाठी स्थगित करायचे ? या संबंधात कोअर कमिटी ची बैढक दुरध्वनीच्या माध्यमातुन घेण्यात आली.

आम्हाला वर्धा पोलिस व नगरपरिषदेच्या मार्फत जागा खाली करण्यासाठी दोन महिणे आधीही नोटीस मिळाली होती. तशीच नोटीस यावेळेस पण नोटीस मिळाली.

याअनुशंगाने वर्धा जिल्हा शेतकरी-कामगार आंदोलन समन्वय समन्वय समितीच्या बैठकीत व कोअर वैटसप गृपवर सर्व कोअर समिति सदस्यांनी कोरोना या महामारीसंबंधाने जिल्ह्यातील जनतेच्या सामाजिक आरोग्याविषयीची काळजी व जबाबदारी म्हणुन 133 दिवसांपासूनचे सतत चाललेले शेतकरी प्रश्नांवरील आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यासाठी सहमती दर्शवली. समितीने सामुहिकपणे निर्णय घेऊन शेतकरी आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्याचे ठरविले आहे.

त्यानूसार सोमवार 26 एप्रील 2021 ला सकाळी 9.00 वाजता वर्धा येथील बजाज चौकातील शेतकरी आंदोलन पंडाल काढण्याचे ठरविले आहे.

शेतकरी आंदोलन पुढेही निरंतर करू पण आज समाजाला आरोग्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच्या नियमांमध्ये शारिरीक अंतर व स्वच्छता यासाठी सहकार्य केले पाहीजे ,तसेच या काळांत कोरोना व अन्य आजाऱ्यांना सेवा पुरविण्याचे रचनात्मक कार्य सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून करावे असे
शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समिती ने मत व्यक्त केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular