Friday, April 19, 2024
Homeवर्धाहिंगणघाट १३५ तर समुद्रपूर १९४ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मोबाईल परत

हिंगणघाट १३५ तर समुद्रपूर १९४ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मोबाईल परत


शासनाने योग्य निर्णय घेतले नाहीतर २४ सप्टेबर रोजी देशव्यापी संप

शासनाने दिलेले मोबाईल ठरले कुचकामी

शासनाने आँनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत ,या मोबाईची वाँरटी संपलेली असून हँग होणे ,बंद पडणे,डिसप्ले जाणे, आयसे प्रकार घडत आहेत .मोबाईल दुरुस्तीचा भुर्दड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे .या प्रकाराला ञासलेल्याआंगवाडी कर्मचाऱ्यांनी १७ आँगस्ट पासून शासनाला मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला .याची सुचना शासनाला आयटकने फरवरीत तर अंगणवाडी कृती समितीने तिन महिने अगोदरच दिली होती . १६ आँगस्ट पर्यत निर्णय शासनाने घेतले नाहीतर १७ आँगस्ट पासून मोबाईल परत करण्याला सुरुवात केली असून आज २० आँगस्ट शुक्रवार बालविकास प्रकल्प कार्यालय हिंगाणघाट व समुद्रपूर येथे अंगणवाडी सेविकाने मोबाईल कार्यालयात जमा केले हिंगणघाट आयटक उपाध्यक्ष ज्ञानेश्वरी डंबारे अल्का भानसे शोभा सायंकार इरफाना पठाण वंदना झाडे तर समुद्रपूर येथे सुनंदा आखाडे हिरा बावने माला कुतरमारे प्रभा कांबळे संगिता टोणपे सविता तडस उत्तरा शेवडे प्रभा भगत आशा तराळे वंदना मोहीतकर मनिषा चरडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन मोबाईल परत कण्यात आले.
शासनाने योग्य निर्णय घेतले नाही तर २४ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय आयटकने घेतला..
शासनाने दिलेले सर्व जूने मोबाईल परत घेवून नविन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे मोबाईल मध्ये बाघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.
केंद्र शासनाने जूना काँमन एप्लीकेशन एप्स (कँश) बंद करुन नविन पोषण टँकर एँप्स दिलेला असून तो सदोष आहे .सर्व माहीती इंग्रजी बरावी लागत आहे महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असल्यामुळे पोषण टँकर एँप्स मराठीत करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दिलेल्या मोबाईलची वाँरंटी संपली आहे सतत हँग होणे. गरम होणे बंद पडणे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत दुरुस्तीचा येणारा खर्च सेविकांनाच करावा लागत आहे .रँम कमी असल्यामुळे अँप्स डाऊनलोड करण्यासाठी जागाच नाही केंद्र शासनाने लादलेला पोषण टँकर अँप्स सदोष असून अंगणवाडी सेविकांवर लादला जात आहे.इंग्रजी न येणाऱ्या अनेक सेविकांना त्यात इतरांच्या मदती शिवाय माहीती भरने शक्य होत नाही .वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलने .दैनंदिन करण्याचे काम भरण्याची पध्दत अतिशय किचकट आहे. त्यामुळे उलट तान वाढत आहे
कँश अँप्स सारखी पध्दत मराठीत देण्यात यावी
यावेळी आयटकचे सोनाली पडोळे अल्का भानसे यांनी मार्गदर्शन केले ,
बालविकास प्रकल्प अधिकारी हिंगणघाट व समुद्रपूर यांना पोलीसांच्या उपस्थिती मध्ये अंगणवाडी सेविकांनी मोबाईल (सुपूद )परत करण्यात आले
छाया गाठे सुनिता बांगरे मंगला चांदेकर इंदिरा निखाडे मंदा तमगिरे गिता पाटील संगीता साठे तारा डेहेन संगीता काळे विजया उरकुडे आशा खाडे अनिता राउत सुरेखा शिंदे रत्नमाला बहादूरे वैशाली गाठे छाया ओरके
इत्यादी आंदोलनात मोठ्या संख्येने सेविका सहभागी होत्या

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular