Tuesday, March 19, 2024
Homeवर्धासेवार्थ फाउंडेशन तर्फे 221 वृक्ष लागवड

सेवार्थ फाउंडेशन तर्फे 221 वृक्ष लागवड

वर्धा : दिवसांदिवस वाढणारी लोकसंख्या, शहरीकरण, आणि इतर सुख सुविधान करता जंगलाची मोठया प्रमाणात कटाई करण्यात येत आहे. त्यामुळे झाडांचे प्रमाण कमी झाले. त्याचा परिणाम हा आपल्यालाच भोगावा लागणार आहे याची आपल्याला जाणीव व्हावी या करिता सेवार्थ फाउंडेशन तर्फे ऑक्सिजन पार्क वर्धा येथे वृक्ष लागवडीचा संकल्प केला आणि आज रविवार दिनांक 11 जुलै रोजी 221 वृक्ष ऑक्सिजन पार्क, आय टी आय टेकडी वर्धा येथे लावण्यात आले,

यावेळी डीसोम द लीडरसिप स्कुलच्या कोअर टीम मेंबर जया अय्यर ( न्यू दिल्ली )प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी बोलताना ‘असे एकही वृक्ष नाही की ज्याचा उपयोग होऊ शकत नाही, प्रत्येक वृक्षांचा आपला एक वेगळा गुणधर्म आहे, असे त्या म्हणाल्या’ सोबतच अमित ( झारखंड ), निसर्ग सेवा समिती येथील अध्यक्ष मुरलीधर बेलखेडे, प्रा. पुसदकर , डॉ. चिकाटे , प्रा. पडक्के , निसर्ग सेवा समिती येथील कार्यकर्ते सेवार्थ फाउंडेशन चे पदाधिकारी, स्वयंसेवक व इतरत्र मान्यवर उपस्थित होते,

अशा सामाजिक कार्यात सहभागी होऊन कार्य पूर्ण करू, असे आवाहन सेवार्थ फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular