Friday, April 19, 2024
Homeवर्धासेलू तालुक्यातील तीन ग्रामपंचायत ची सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक,

सेलू तालुक्यातील तीन ग्रामपंचायत ची सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक,

सेलू : तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची झालेल्या निवडणुकीत दोन ग्रामपंचायती हिंगणी आणि चारमंडळचे सरपंच अविरोध निवड झाली तर येळाकेळी ग्रामपंचायतीच्या
सरपंच पदी भारती चलाख तर उपसरपंच पदी रुपेश पिंपळे आणि
हिंगणी ग्रामपंचायत सरपंच पदी दामिनी प्रमोद डेकाटे तर उपसरपंच पदी स्वप्नील प्रभाकर मुडे यांची निवड करण्यात आली.


चारमंडळ ग्रामपंचायत सरपंच पदी नीता संजय शेळके,तर उपसरपंचपदी सुंदरलाल ईश्वरलाल पाटील यांची निवड करण्यात आली.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या येळाकेळी ग्रा.प. मध्ये भाजप प्रणित आघाडीचे एकहाती बहुमत असताना फूट पडून चार विरुद्ध नऊ मतांनी सरपंच व उपसरपंच्या ची निवड करण्यात आली.
सरपंच पदी भारती देवेंद्र चलाख ह्यांची तर उपसरपंच पदी रुपेश रामभाऊ पिंपळे यांची निवड करण्यात आली. 13 सदस्य संख्या असलेल्या या ग्रा.प. 12 सदस्य भाजप समर्पित आघाडी चे तर 1 सदस्य अपक्ष निवडून आला होता. स्पष्ट बहुमत असताना सदस्यांचे मत विचारात न घेता वरीष्ट पदाधिकाऱ्या नी सरपंच पदासाठी दबावतंत्राचा वापर केल्याने सदस्यांत फूट पडली आणि पळवा पळवीचे राजकारण करून वरिष्ठ पदाधिकाऱ्या ना न जुमानता चार विरुद्ध नऊ मतांनी सरपंच व उपसरपंचा ची निवड करण्यात आली.
तसेच 15 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या हिंगणी ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीमध्ये दामिनी प्रमोद डेकाटे ह्या अविरोध निवडून आल्या तर उपसरपंच पदाकरिता गुप्त मतदानामध्ये स्वप्नील प्रभाकर मुडे यांना 9 मते तर मोरेश्वर अरुण बर्डे यांना 6 मते मिळाली, तर नऊ सदस्य संख्या असलेल्या चारमंडळ ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच पद हे अविरोध झाल्यामुळे सरपंचपदी नीता संजय शेळके तर उपसरपंचपदी सुंदरलाल ईश्वरलाल पाटील हे विजयी झाले,
येळाकेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी रामकृष्ण सायरे, तलाठी साळवी, ग्रामविकास अधिकारी अंगद सुरकार हे उपस्तीत होते. तसेच हिंगणी येथे निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी हनुमंते, ग्राम विकास अधिकारी वैरागडे, तसेच महसूल विभाग चे श्री वाघ यांनी काम पाहिले,
Box
आज तालुक्यात येळाकेळी ,हिंगणी व चारमंडळ येथील सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली हिंगणी येथे दामिनी डेकाटे तर उपसरपंच म्हणून स्वप्नील मुडे यांची निवड करण्यात आली चारमंडळ येथे सरपंच म्हणून नीता संजय शेळके यांची तर उपसरपंच म्हणून सुंदरलाल पाटील यांची निवड करण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular