Thursday, March 28, 2024
Homeवर्धासावरखेडा वाशियांचा शेतकरी विधेयक मागे घेण्याकरिता ग्रामसभेत घेतला एकमताने ठराव

सावरखेडा वाशियांचा शेतकरी विधेयक मागे घेण्याकरिता ग्रामसभेत घेतला एकमताने ठराव

तालुका प्रतिनिधी अमोल झाडे समुद्रपुर

समुद्रपुर:-
तालुक्यातील सावखेडा गावात द्वितीय सर्वोच्च संसद घेण्यात आली.या ग्रामसभेत सर्वानुमते शेतकरी विधेयक मागे घेण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
या ग्रामसभेचे अध्यक्ष प्रवीण गुलाबरावजी राऊत तर प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच देवराव रहाटे ,शितल राहुल भगत, हभप माणिक राऊत महाराज, सिंधुताई कुडमते आदी उपस्थित होते.


ग्रामसभेचे प्रास्ताविक पोलीस नागरिक वर्धा जिल्हा समन्वयक दिव्यांगी हरीश कुंभारे यांनी करून ठराव ग्रामसभे समक्षवाचून दाखविले.त्यानतंर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सौ नलू पंढरीनाथ थुटे,सौ अरूणा राजू राऊत ,गुलाब पंढरीनाथ रहाटे यांना रजिस्टर पेन व तिरंगाध्वज ग्रामसभा अध्यक्ष प्रवीण राऊत यांचे हस्ते प्रदान करून त्यांना सम्मानित करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील कृषी आंदोलन संपूर्ण करिता केंद्र सरकारद्वारे पारित कृषी संबंधित तीन कायदे त्वरित रद्द करण्यात यावे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.विजय थुटे, प्रशांत मांडवे, शितल राहुल भगत, देवरावजी रहाटे यांची
पोलीस नागरिक समन्वयक म्हणून निवड करण्यात आली,
ग्रामसभेत रस्ते पूल जलसंधारण, वृक्षारोपण, मल्टीस्पेशलिटी हॉल, इत्यादी विषयावर सर्वानुमते चर्चेअंती ठराव पारित करण्यात आले असून हे ठराव मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य ,जिल्हाधिकारी,.कार्यकारी अधिकारी जि पण, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा जिल्हा यांना पाठविण्यात येणार आहे.या ग्रामसभेला गावातील जेष्ठ नागरिक तुकाराम पाटील थुटे, बाबारावजी थुटे, विलास राऊत, पंढरीनाथ रहाटे, बाबारावजी थूटे, मनोहर कुडमते इत्यादी महिला पुरुष युवा नागरिक उपस्थित होते, ग्रामसभेच्या यशस्वितेसाठी सर्वस्वी पोलीस नागरिक समन्वयक प्रमोद मांडवे योगेश राऊत ग्राम संरक्षण दलाचे विजय राऊत विजय थुटे सौरभ बोधनकर चेतन थुटे रूषभ थुटे अभि थुटे किशोर भगत मारुती चापले कुणाल राऊत सागर तोटे इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले आभार प्रदर्शन विजय थोटे यांनी तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्र वंदनेने झाली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular