Saturday, April 20, 2024
Homeवर्धासरकार कोरोनाचे आकडे लपवत आहे :देवेंद्र फडणवीस

सरकार कोरोनाचे आकडे लपवत आहे :देवेंद्र फडणवीस

वर्धा:
राज्यात कोरोनाचे 65 हजार रुग्ण आहेत. प्रादुर्भावही 15 टक्क्यांपेक्षावर गेला आहे. त्यामुळे सरकारने चाचण्याचा वेग वाढवावा. मृतकांच्या आकड्यावरून अंदाज येत नाही त्यामुळे सरकारने आनंदी होऊ नये. राज्य सरकार कोरोनाचे आकडे लवपत आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस यांनी आज 28 रोजी वर्ध्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले असता ते पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. दादाराव केचे, आ. डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


आपण या दौर्‍यात जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनात येणार्‍या अडचणी समजून घेत कोरोनाचा आढावा घेतला. प्राणवायूचीस्थिती आणि खाटा वाढवण्याची गरज असल्याचे चर्चेतून लक्षात आल्याची माहिती घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जिल्ह्यात प्राणवायू प्लॉन्टची मागणी नोंदवण्यात आली आहे. ती मागणी लवकर पुर्ण झाली पाहिजे. घाईघाईने काम करण्याची आवश्यकता असल्याचे ते पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले. मनुुष्यबळाची कमी असल्याची चर्चा झाली असून सरकारने मनुष्यबळाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी सिस्टममध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आयसीयूच्या खाटा वाढवण्याची गरज असून प्राथमिक व्यवस्थेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वर्धा शहरापासून जे दूरची गाव आहेत त्या ठिकाणीही प्राथमिक व्यवस्था उभ्या कराव्यात. प्राथमिक आरोग्य केेंद्रांसोबतच प्राथमिक दक्षाता केंद्र उडण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सेवाग्राम आणि सावंगी या दोन्ही मेडिकलवरील भार कमी होईल, त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. सरकारने आभासी जगण्यापेक्षा वस्तूस्थितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular