Friday, March 29, 2024
Homeवर्धासमुद्रपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद सावटविहिरींनी गाठला तळ ;

समुद्रपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद सावट
विहिरींनी गाठला तळ ;

नविन पाणी पुरवठा योजना अद्याप अर्धवट
समुद्रपूर : – पावसाळ्यात नगण्य झालेला पाऊस , अद्याप सुरु न झालेली नविन पाणीपुरवठा योजना, पुरातन पाणीपुरवठा योजनेवरचे अवलंबित्व व ऐन् फेब्रुवारी महिण्यातच विहीरीनी गाठलेला तळ यामुळे मार्च महिण्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईचे सावट समुद्रपूर शहरावर गडद झाले आहे.


या वर्षी मार्च महिण्याच्या सुरूवातीलाच उन्हाचे तडाखे बसणे सुरू झाले आहे. नगरपंचायतीची पाणी पुरवठ्याची मदार ३० वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेवरच अवंलबून आहे. तीस वर्षाच्या कालावधीत शहराची लोकसंख्या दहापटीने वाढली पण पाणी पुरवठ्याची सोय तीच आहे. कधी दोन दिवसांआड तर कधी चार दिवसांआड नागरिकांना पाणी दिले जाते. कधी कधी तर आठ -आठ दिवस नळाला पाण्याचा थेंबही येत नाही. नविन १३ कोटीची पाणी पुरवठा योजना अर्धवट अवस्थेत आहे. वार्ड क्रमांक १३ , १४ व १५ मध्ये नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे नळ सुध्दा नाही. त्यामुळे येथील जनतेला घरगुती विहीर व बोअरवेलच्याच पाण्याचा आधार आहे.पण मार्च महिण्याच्या सुरुवातीलाच विहीरींनी तळ गाठला असून या महिण्याच्या अखेरीस विहीरींना कोरड पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन परिस्थिती चिघळू शकते.नगरपंचायत प्रशासनाने वेळीच नियोजन करून परिस्थिती हाताळावी लागणार आहे.

नगरपंचायतीसमोर टॅंकरचाच पर्याय

नविन पाणीपुरवठा योजना अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे व जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी असल्यामुळे नगरपंचायतीसमोर नागरिकांना टँकरनेच पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

नगरपंचायतचा ‘भार ‘ प्रभारीवरच
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी दिर्घ सुट्टयावर असल्याने नगरपंचायतीचा प्रभार हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांचेकडेच आहे. दोन -दोन ठिकाणी काम करतांना त्यांची तारांबळ होत असून पाण्याचा प्रश्न ते सोडवतील की समुद्रपूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पावसाळ्यात अल्प पाऊस
मागिल वर्षी १०९६ मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे पाण्याची झळ समुद्रपूरवासीयांना पोहचली नाही मात्र यावर्षी ६३८ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. एवढा अल्प पाऊस मागील दहा वर्षात झाला नाही. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची धग पाणीटंचाईच्या रूपात येणार आहे.

लाल विहरी चे पानी घेवून काही वार्डात वाटप

.सध्या काही जूने वार्डात लाल विहरितून जे पानी पिण्यास अयोग्य आहे त्या विहिरीचे पानी टाकित घेवुन नाळातून सोडन्यात येत आहे. या विहरी चे पानी बरयाच वर्षा पासून उपयोगात नव्हते.नगर पंचायत ने ब्लीचींग पावडर विहरीत आठवडातून टाकावे ही मागनी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया : –
मार्च महिण्यातच विहीरींना कोरड पडली आहे. अजून उन्हाळ्याचे तीन महिने आहेत. नगरपंचायतीने नविन पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू केली नाही.टँकरने पाणीपुरवठा झाला तरी तो अपुराच असतो.
ताराचंद रणदिवे, वार्ड क्रमांक १३

घरच्या विहीरीने तळ गाठला आहे. आमच्याकडे नगरपंचायतीचे नळ योजनेची जलवाहिनी ३० वर्षापासून पोहचली नाही.परिसरात एकही सार्वजनिक विहीर ,बोरवेल नाही. पाण्यासाठी आम्ही आता कुठे भटकंती करावी.
कुणाल खिळेकर
नागरिक समुद्रपूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular