Thursday, March 28, 2024
Homeवर्धासमुद्रपुर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचे निकाल पंचरंगी

समुद्रपुर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचे निकाल पंचरंगी

  • सहा ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा
  • सुजातपुर ग्रामपंचायतवर प्रहारचा झेंडा

समुद्रपूर:-
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारीला पार पडलेल्या निवडणूकीचे मतमोजणी आज करण्यांत आली. तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत गिरड येथे भाजपाने सत्ता कायम ठेवली . भाजपाने ८, कॉग्रेस ५ सेना १ राष्ट्रवादी कॉंग्रेस १ मागील पंचवार्षिक संरपंच असलेले विजय तडस यांचा दारुन पराभव झाला.तर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी सरपंच दिपक पंढरे हे पराभूत झाले.

साखरा ग्रामपंचायतवर माजी आमदार राजू तिमांडे व शिवसेना यांनी आघाडी करुन ९ जागा काबीज केल्या.
हिवरा ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटनेने ६ जागेवर विजय प्राप्त करून ३ जागेवर शिवसेनेला विजय मिळाला. लाहोरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सुधिर कोठारी गटाला ६ जागेवर विजय मिळवून ३ जागा बसपा ला मिळाल्या राष्ट्रवादीला सत्ता कायम ठेवण्यास यश मिळाले. कोरा ग्रामपंचायत मध्ये ११ पैकी ८ जागा भाजपाला मिळाल्या व सत्ता कायम केली. मंगरूळ ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडिने विजय मिळविला. उसेगाव ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ४ भाजापाला विजय प्राप्त झाला. हळदगाव, शिवणी ९ जागा पैकी ८ भाजपाने विजय प्राप्त केला. सावंगी ( झाडे ) येथे महा विकास आघाडी ४ तर ३ भाजपला जागा मिळाल्या. पवनगाव ९ पैकी भाजपाला १ तर महाविकास आघाडी ला ८ जागेवर विजय प्राप्त झाला. मोहगाव येथे सामिश्र सत्ता प्राप्त झाली. नारायनपूर येथे भाजपाला निर्भड बहुमत प्राप्त झाले.पिपरी येथे राष्ट्रवादी यश संपादान झाले.दसोडा ग्रामपंचायत मध्ये महा विकास आघाडीने यश संपादन केले.चिखली ग्रामपंचायत मध्ये भाजपाला यश. कांढळी ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस सुधिर कोठारी गट व आघाडी ५ जागा तर भाजपा ४ प्राप्त झाल्या.
सुजातपूर ग्रामपंचायत मध्ये प्रहारचा झेंडा फडकला आहे.
१७ ग्रामपंचायती पैकी ६ ग्रामपंचायतीवर भाजापाने सत्ता हस्तगत केली. या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आ. राजू तिमांडे यांचा गट व ॲड सुधिर कोठारी व यांचा गट हे दोन्ही निवडूकीत एकत्र लढले असते.तर ग्राम पंचायत निवडणूकीचे चित्र काही वेगळे असते भाजपाला मिळालेले जागेवर फरक पडला असता असे मत गावखेडयातील जनतेने व्यक्त केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular