Thursday, March 28, 2024
Homeवर्धाशोभेची वस्तू बनलेले जलशुद्धीकरण सयंत्र पुन्हा देणार काय नागरिकांना सेवा

शोभेची वस्तू बनलेले जलशुद्धीकरण सयंत्र पुन्हा देणार काय नागरिकांना सेवा

सेलु :
सामाजिक बांधीलकी निधीतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकाळात तालुक्यातील पांडवकालीन एकचक्रनगरी तसेच विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक नवसाला पावणारा गणपतीचे श्रध्दास्थान असलेले ख्यातीप्राप्त गाव केळझर येथे जलशुद्धीकरण सयंत्र तसेच ग्राम स्वच्छतेचा विचार करुन गावातील कचरा गोळा करण्यासाठी कचरागाड्यांचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अम्रुता फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले होते.परंतू सयंत्रात दोन वर्षानंतरच बिघाड


आल्यामुळे व दुरुस्तीसाठी लागणारा खर्च अवाढव्य प्रमाणात असल्यामुळे ते आज धूळखात पडून आहे. म्हणून नागरिकातून नाराजीचे सूर उमटतआहे.
पुरवठादाराने सयंत्र तर मोठ्या आनंदाने बसवून दिले.परंतू त्यानंतर मिळणाऱ्या सेवेच्या मोबदल्यात बुक्काच दिला.देखरेख व दुरुस्ती च्या अभावात पाण्यातील ब्लिचिंग पावडरचा थर त्या सयंत्रात गोळा होत गेले व अवघ्या दोन वर्षातच शुध्द पेयजल देणारे सयंत्र बंद पडले.
त्या सयंत्र दुरुस्ती साठी प्रयत्न ही शारदा महिला बचत गटाकडून केल्या गेले परंतू लागणारा खर्च हा लाख रुपयाचे घरात असल्याचे सांगितल्या गेल्याने पैशा अभावी त्यांचा उपाय चालला नाही. आता दुरुस्तीचा खर्च कुणी करावा
या वादात सयंत्राचा प्रश्न रेंगाळत गेला व तेव्हा पासून ते सयंत्र दुर्लक्षितच आहे.
ग्रामस्थांना या जलशुद्धीकरण सयंत्रामुळे शुध्द पेयजल स्वस्त दरात मिळत होते.त्यामुळे आरोग्य ही चांगले राहत होते. या सयंत्राची जवाबदारी ही शारदा महिला बचतगट,केळझर कडे सोपविण्यात आली होती.त्यांनी ते काम ही चांगल्याप्रकारे राबविले. नागरिकानांही पाच रुपयात २० लिटर शुध्द पेयजल मिळत असल्याने तसेच पाण्यासाठी वणवन भटकावे लागत नसल्याने ते ही याचा उपयोग स्वखुशीने करु लागले. परंतू त्या सयंत्राचा पुरवठादाराकडून झालेल्या निष्काळजी पणाचा फटका गावकऱ्यांना सोसावा लागला. आज धूळखात पडून असलेल्या सयंत्राची पूर्णतः वाट लागली असून ते सयंत्र फक्त शोभेची वस्तू बनून राहून गेले आहे.
स्थानिक ग्रामपंचायतला हे सयंत्र हस्तांतरीत करण्यात आले नव्हते. म्हणून ते ही याकडे लक्ष देत नाही.दोन तीन वर्षाचा कालावधी लोटून ही त्याच्यावर होणाऱ्या खर्चाचा प्रश्न निकाली लागला नसल्याने भविष्यात सदर बिघाड आलेले जल शुध्दीकरण सयंत्र सुरु होण्याची उम्मेद मालावली आहे. गावकऱ्यांच्या उपयोगाचे हे सयंत्र दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक संस्थेने किंवा लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी होत आहे. अन्यथा याN लोकोपयोगी योजनेचे लाखो रुपयाचे हे सयंत्र हे भविष्यात भंगार वाल्याचे धन बनल्याशिवाय राहणार नाही यात दूमत नाही अशी प्रतिक्रिया केळझर ग्रामस्थ व्यक्त करु लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular