Friday, April 19, 2024
Homeवर्धाशेतक-यांनी सोयाबिन बिजोत्पादनासाठी नोंदणी करावी

शेतक-यांनी सोयाबिन बिजोत्पादनासाठी नोंदणी करावी

वर्धा : 2020 च्या खरीप हंगामात घेण्यात आलेल्या सोयाबिन बियाण्याची बिजोत्पदानाची प्रत अति पावसामुळे खराब झाली. तसेच उत्पादकताही बरीच कमी आल्यामुळे खरीप 2021 च्या हंगामाकरीता राज्यास लागणा-या सोयाबिन बियाणे उपलब्ध होण्याचे दृष्टीने महाबिज शासनाच्या निर्देशानुसार उन्हाळी 2020-21 हंगामासाठी जिल्हयात लागणा-या सोयाबिन बियाण्याकरीता प्रायोगिक तत्वावर सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ज्या शेतक-यांकडे ओलिताची सोय आहे. व जे शेतकरी उन्हाळी हंगामात सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रम घेऊ इच्छितात अशा शेतक-यांनी महाबिजच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या 8669642784 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाबिजचे विभागीय व्यवस्थापक व्ही.सी. पाटील यांनी केले आहे.

      सोयाबिनचे बिजोत्पादन  कार्यक्रम घेऊ ईच्छिणा-या शेतक-यांनी बिजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी करावी.  उन्हाळी  हंगामात सोयाबिन बिजोत्पादन कार्यक्रमाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या  पंधरवाडयापर्यंत  केल्यास अधिक फायदेशिर   ठरेल त्यामुळे  ईच्छुक  बिजोत्पादक  शेतक-यांनी  तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यानी   महाबिज कार्यालयाशी संपर्क साधावा. असे  महाविज कार्यालयाने कळविले आहे.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular