Thursday, March 28, 2024
Homeवर्धाशेतकऱ्यांना चायना फवारणी पंपाची भुरळ

शेतकऱ्यांना चायना फवारणी पंपाची भुरळ

शोयब शेख
देवळी:-
चीन सोबत सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी शासनाकडून ॲप बंदी घातली. असे असताना फवारणीसाठी शेतकऱ्यांचा कल मात्र चायना पंपा कडे आहे.पारंपारिक पद्धतीने हाताने दांडा हलवून फवारणी करण्यापेक्षा थोड्या मेहनतीत आणि कमी वेळात पिकांवर औषध फवारणी करणे शक्य असल्याने या पंपाची शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे. पेरण्या झाल्या की पिक फवारणी वर येते.

त्यातच मजुरांचा अभाव असून फवारणीसाठी मजूर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना स्वयंचलित फवारणी पंपाची माहिती मिळताच त्यांच्याकडून या पंपाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. शेतीमध्ये अधिक दर्जेदार पीक उत्पादनासाठी कीटकनाशके, विद्राव्य खते, बुरशीनाशके, तणनाशके यांची फवारणी महत्त्वाची ठरते. सध्याच्या काळात कमी खर्चाच्या शेतीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिला जात आहे. या कंपनीमुळे खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे बाजारात स्वयंचलित चायना फवारणी पंप दाखल झाल्याने सध्या त्यांच्या खरेदीसाठी कृषी साहित्य विक्री दुकानांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. कमी खर्चात बॅटरीवर चालणारा चायना फवारणी पंप 12 व्होल्ड बॅटरीवर चालतो. सोबत चार्जिंग करण्यासाठी चार्जर पण त्यात दिलेले आहे. या पंपाची समजा 10 ते 20लिटर या प्रकारामध्ये उपलब्ध आहे. वजनाने हलका असल्यामुळे शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सुद्धा सोपा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तीन ते चार तास तो चालतो या फवारणी पंपाची किंमत 2200 रू ते 3500 रुपयापर्यंत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांकडून अलीकडच्या काळात या पंपाची मागणी व वापर वाढला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular