Thursday, March 28, 2024
Homeवर्धावडिलाने खुनाच्या गुन्हात साक्ष दिली म्हणून आरोपीने त्याचा मुलाचा खुन करुन परत...

वडिलाने खुनाच्या गुन्हात साक्ष दिली म्हणून आरोपीने त्याचा मुलाचा खुन करुन परत गुन्हात अडकला

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांनी दिला निर्णय

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत येत असलेले साकुर्ली या गावातील आरोपी संदीप राजाराम बावणे याने नात्याने चुलत भाऊ असलेल्या गजानन बावणे याचा सात वर्षापुर्वी खुन केला होता, ह्याप्रकरणी साक्षदार म्हणून दौलत श्रावण शंभरकर यांची महत्वपूर्ण साक्ष होऊन त्या आधारे न्यायालयाने संदीप बावणे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

सदर निर्णयाच्या विरोधात आरोपीने उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली त्याचा निर्णय लागेपर्यन्त आरोपी संदीप बावणे चार वर्षापर्यन्त पोलीस कोठडीत शिक्षा भोगत होता. जेव्हा या प्रकरणातील उच्च न्यायालयाचा निर्णय लागला त्या आदेशानुसार संदीप बावणे हा पोलीस कोठडीतून बाहेर येऊन गावात परतला व दारु पिऊन परत गावात तीन चार लोकांचा खात्मा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणत तुझ्या बापाने माझे विरोधात न्यायालयात साक्ष दिल्याने मी पोलीस कोठडीत गेलो म्हणत वचपा काढण्यासाठी आरोपी संदीप राजाराम बावणे याने दौलत श्रावण शंभरकर यांचा मुलगा आकाश दौलत शंभरकर याचा खुन करुन दुसरा खुन करुन परत आरोपी झाला. वडीलांनी साक्ष दिल्याने आरोपीने खुन्नस भावनेने मुलाचा खुन केल्याने समाज मन सुन्न झाले. जर आरोपी प्रवृत्तीचे लोक असेच करीत राहले तर न्यायालयात साक्ष देण्यासही लोक धजावणार नाहीं हे यावरुन लक्षात येते. दौलत शंभकरकर यांची दौलत असलेला मुलगा आकाशला यामुळे गमवावे लागले ही एक सत्य विंवेचना…. याबाबत सविस्तर माहिती अशी कि साकुर्ली(तरोडा) येथील भाऊराव कापटे, मुलगी मंदा कापटे तसेच संदीप दौलत शंभरकर हे तिघेही तरोडा याठिकाणी भरणा-या यात्रेत दि. १८ जानेवारी २०१८ ला सायं. ६:०० वाजता. सहभागी होण्यासाठी गेले होते, यात्रेवरुन रात्री ८ते ८:३० वा.चे दरम्यान साकुर्ली येथे परत आले. तेव्हां आकाश चे वडील दौलत शंभरकर हे मुलगा घरी आला नाही म्हणून मुलाचा बोलविण्या करीता कापटे यांचे घरी गेले, तेव्हां आकाश वडिलास म्हणाला कि तुम्ही समोर चला मी आलोचं तुमचे मागून असा संवादात्मक चर्चा करुन वडील घरी पोहचले आकाश हा कापटे कडे चालक म्हणून नौकरी करायचा तेव्हा कधी कधी तो तेथेच झोपत असल्याने दौलत शंभरकर यांनी लक्ष न देता जेवन करुन रात्री घरचे सर्व झोपी गेले. दुसरे दिवशी सकाळी ८:३० वा. शंभरकर यांचे जावई सुशील गांवडे यांनी सासरे यांना आकाश याचा खुन झाला असल्याची माहिती देते त्याचा मृत्यु देह नारायण दानवे यांचे शेतातील नालीमध्ये पडून आहे. असे सांगताच शंभरकर सासरे जवाई दोघेही घटनास्थळी गेले असता आकाशचे कानातून व डोक्यातून रक्त निघत होते आजुबाजुला पाहिले असता रक्ताचे डाग आरोपी संदीप राजाराम बावणे याचे घरापर्यन्त आढळून आले व आरोपीच्या घराला कुलूप लावून दिसले त्यामुळे संशय अधिक गडद झाला त्याआधारे पोलीसांना माहिती देत आरोपीला जेरबंद करण्याकरीता पोलीस स्टेशन हिंगणघाट ने तत्परता दाखवित त्यास बडनेरा येथून अटक केली. या प्रकरणी न्यायालयात १४ साक्षीदाराची नोंद करीत पुराव्यानिशी साहित्य जप्तीचे आधारे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मांजगावकर यांनी या खुन प्रकरणी आरोपी संदीप बावणे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली तर सरकारी पक्षातर्फे अँड. दिपक वैद्य यांनी युक्तिवाद केला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular