Thursday, March 28, 2024
Homeवर्धावंजारी समाज महिला मंडळाचे वतीने भगवानबाबा पुण्यतिथी साजरी

वंजारी समाज महिला मंडळाचे वतीने भगवानबाबा पुण्यतिथी साजरी

 
हिंगणघाट ; येथील वंजारी समाज महिला मंडळाचे वतीने वंजारी समाजाचे आराध्य दैवत भगवानबाबा यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली.                 
   या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका छाया सातपुते होत्या,तर प्रमुख अतीथी म्हणून अनिता माळवे उपस्तित होत्या.                                       कार्यक्रमाची सुरवात भगवानबाबा यांचे प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आली.यावेळी उपस्तित मान्यवरानी भगवानबाबा यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका सातपुते म्हणाल्या की भगवानबाबा यांनी वंजारी समाजाला नवी दिशा देऊन समाज जागृती केली.
तसेच अपत्याना शिक्षण देण्याकरिता,वेळ पडल्यास शेती विका परंतु अपत्याना शिकवाच,हा मोलाचा संदेश दिला होता.त्यामुळे वंजारी समाजाची मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वाटचाल सुरु आहे असे मनोगत व्यक्त केले.      
   प्रस्तविकासह संचालन कांचन साळवे हिने केलेतर उपस्तितांचे आभार अरुणा हेमके यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजनाकरिता प्रतिभा साळवे,माया धात्रक,रेखा हेमके,आरती धात्रक,मोनाली आखाड़े,सोनाली केदार आदि महिलानी सहकार्य केले.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular