Thursday, March 28, 2024
Homeवर्धालायन्स क्लब आर्वी यांचा पदग्रहण समारंभ

लायन्स क्लब आर्वी यांचा पदग्रहण समारंभ

वर्षे 21-22 ची नवीन कार्यकारिणी गठित
२७ नवीन सदश्यांचा समावेश

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब आर्वी यांच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच स्थानिक आयनॉक्स हॉल, येथे संपन्न झाला. वर्ष 21-22 साठी लायन्स क्लब आर्वी च्या अध्यक्षपदी लाॅ. नितीन वानखडे, सचिवपदी लाॅ. सुनीता जाणे,कोषाध्यक्षपदी लाॅ. प्रमोद नागरे तसेच उपाध्यक्षपदी ला शिल्पा चांडक यांची निवड करण्यात आली.


लायन्स क्लबच्या माजी प्रांतपाल एमजेएफ लॉ सौ. प्रतिभाताई अदलकिया यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांना नवीन पदाची शपथ देण्यात आली. त्यावेळी लायन्स क्लब आर्वीचे मावळते अध्यक्ष डॉ दीपक चव्हाण यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नितीन वानखडे यांच्या स्वाधीन केली .
या कार्यक्रमाला लायन्स क्लब आर्वीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रीपल राणे, माजी अध्यक्ष व रिजन चेयरपरसन डॉक्टर कालिंदी ताई राणे, माजी प्रांतपाल लॉयन्स विनोदजी वर्मा हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी लायन्स क्लब आर्वी मध्ये २७ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला व त्यांना ला डॉ कालिंदी राणे ,रीजन चेअरपर्सन यांच्या हस्ते सदस्य पदाची शपथ देण्यांत आली .
कार्यक्रमाची सुरुवात सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली तर ध्वजवंदना सौ शिल्पा चांडक यांनी केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. सुमंत देशमुख व लाॅ. आरती देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला लायन्स क्लब धामणगाव , पुलगाव तळेगाव व तिवसा येथील पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी लायन्स क्लब पुलगाव ,लॉयन्स क्लब तळेगाव , लायन्स क्लब तिवसा यांचाही पदग्रहण समारंभ संपन्न झाला . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लॉ. डॉ उषा कवरासे यांनी केले . यावेळी लायन्स क्लब आर्वी चे सर्व सन्माननीय सदस्य व आर्वीतील जनमान्य नागरिक उपस्थीत होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular