Friday, March 29, 2024
Homeवर्धालग्न करायच नसल्यान मुलीन मैत्रिणीला घेऊन घर सोडले, दोघीही मिळाल्या गोव्यात कारंजा...

लग्न करायच नसल्यान मुलीन मैत्रिणीला घेऊन घर सोडले, दोघीही मिळाल्या गोव्यात कारंजा पोलिसा सतर्कता

वर्धा : – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. उच्च शिक्षणामुळे बहुतांश मुली लग्नासाठी जोडीदाराची निवड आपापल्या आवडीनिवडी प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कुटुंबात या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने मुली किंवा मुले टोकाचे पाऊल उचलतात .

अशीच कारंजा तालुक्यात एका मुलीने लग्न करायचे नसल्याने मैत्रीणीला सोबत घेऊन घर सोडल्याची घटना घडली . कारंजा पोलिसांच्या सतर्कतेने दोघीना सुखरूप परत आणल्याने दोन्ही कुटुंबांनी चिंतेचा निस्वास सोडला. 

कारंजा येथील एका मुलीच्या घरी लग्नाच्या चर्चा सुरू असताना त्या मुलीला मात्र लग्न करायचं नव्हते . त्यामुळे मुलगी आपल्या मैत्रीणीला सोबत घेऊन घरून निघून गेली. याबाबत नातेवाईकांनी कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवली आणि दोन्ही मुलींना गोव्याच्या पणजीहून ताब्यात घेतले आणि सुखरूप घरी परत आणले. 
प्राप्त माहिती नुसार कारंजा (घाडगे) तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली मैत्रीणी आहे. एकीच्या घरी लग्नाबाबत चर्चा सुरू होत्या. पण, मुलीला लग्न करायचे नसल्याने तिने आपल्या मैत्रिणीला सोबत घेतले आणि घर सोडले. मुली बेपत्ता असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला. पालकांनी याबाबत कारंजा पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीनं शोध मोहीम राबविली. कारंजा येथून नागपूर, नागपूर येथून पुण्याला आणि पुण्याहून त्या गोव्याला गेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कारंजा पोलिसांनी तातडीने गोव्यातील पणजी पोलिसांशी संपर्क साधला. पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिसांनीही तातडीने पावले उचलत ज्या ठिकाणी मुली उतरल्या त्या ठिकाणी पोहचले. मात्र मुली उतरलेल्या ठिकाणी दिसून आल्या नाही. तेथे पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता त्या टॅक्सीत गेल्याचे कळले. पुढे शोध घेताना मिळालेल्या माहितीवरून पणजी पोलिसांनी त्या दोघींना एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. दरम्यान, कारंजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी पोलिसांचे एक पथक गोव्याला रवाना केले. सदर पथक २९ जानेवारी रोजी दोन्ही अल्पवयीन मुलींना कारंजा येथे सुखरूप घेऊन परत आले. कारंजा पोलिसांनी वेळेत दखल घेत तपासाला वेग देत मुलींना सुखरुप परत आणले. त्यांनी सोबत नेलेले दागिणे पोलिसांनी आईवडिलांच्या स्वाधीन केले.

पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहनधुळे, उपनिरीक्षक सचिन मानकर , यशवंत गोहत्रे, पूजा लोहकरे,  निखिल फुटाणे, उमेश खामनकार, विनोद येमबाडे यांनी तपासात सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular