Thursday, April 18, 2024
Homeवर्धाराज्यपालच्या हस्ते शुभम नागपुरे कोरोना योध्दाने सन्मानित

राज्यपालच्या हस्ते शुभम नागपुरे कोरोना योध्दाने सन्मानित


आष्टी /अंतोरा : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम नागपुरे यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते राजभवनात कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



परनूभूती फाउंडेशन आणि द हिंदू फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल भगतसिंग कोसारी आणि परनूभूती फाऊंडेशनचे प्रबंध संचालक डॉ भूषण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या दोन वर्षांपासून ज्या व्यक्तींनी कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता लोकांची होईल त्या मार्गाने मदत करण्यात सातत्य ठेवनाऱ्या व्यक्तींची संपूर्ण महाराष्ट्रातून कोरोना योद्धा म्हणून एकूण १५ व्यक्तींची निवड करण्यात आली. विदर्भातील २ व्यक्तींपैकी एक शुभम नागपुरे आहेत. त्यामुळे त्यांचे आष्टी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून तालुक्यातील हितचिंतकांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

Most Popular