Thursday, April 18, 2024
Homeवर्धाया कठीण काळात आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाजूला काढून एकत्र या

या कठीण काळात आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाजूला काढून एकत्र या

ज्येष्ठ नेते एड सुधीर कोठारी यांचे वडीलकीच्या नात्यातून कळकळीचे आवाहन !

 सध्या कोविडच्या विदारक कठीण संकट समयी प्रसार माध्यमातून विविध प्रकारच्या आटोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडविणे सुरू असून श्रेयवादाची लढाई लढण्या पेक्षा या परिसराच्या हिताचे दृष्टीने सर्व राजकीय पक्षांच्या नेते,कार्यकर्त्यांनी व  सामाजिक संघटनांनी एकाच छता खाली येऊन आरोग्य व अन्य प्रश्नासंबंधी विचारविनिमय करण्याची वेळ आलेली आहे अशी कळकळीची विनंती येथील ज्येष्ठ नेते एड सुधीर कोठारी यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्यातून केलेली आहे.
 या संदर्भात काढलेल्या एका निवेदनातून एड सुधीर कोठारी यांनी शहरातील सर्वच राजकीयव पक्ष नेते,कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटना या उच्च मानवीय मूल्यांची जपणूक करीत या कोरोनाच्या काळात जनतेला दिलासा देण्याचा प्रयन्त करीत आहेत हे अभिमानास्पद आहे मात्र काही दिवसांपासून शोषल मीडियाच्या माध्यमातून उगीचीच एकमेकांना दूषणं देत आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवीत आहे हे खेदजनक आहे.या कठीण काळात आपण सर्व विविध विचार धारेच्या वाचकांनी आपले मतभेद दूर सारून या भागातील सर्वहारा जनतेला कसा न्याय देऊ शकतो या दृष्टीने एकत्र येऊन विधायक चर्चा करून प्रश्न तडीस नेण्याचा प्रयन्त केला पाहिजे.

आपल्या निवेदनात ते पुढे म्हणतात की या जागतिक महामारीच्या संकट काळात आपण आपल्या भागातील वैद्यकीय व्यवस्था किती सक्षम व बळकट करू शकतो की जेणे करून त्याचा दीर्घकाळ येथील जनतेला फायदा होईल याचा विचार करावयास पाहिजे.येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 कोविड बेड्सची उपलब्धता ही आपली प्राथमिकता असावयास पाहिजे.व या मागणी साठी सर्वांनी एकत्र येऊन विधायक रित्या लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे
ही लढाई कोणाच्या नेतृत्वात लढावी हा आजचा प्रश्न नसून जनतेला दिलासा देण्याची खरी गरज आहे.या साठी सर्वांनी एकत्र यावे .मी या कोरोनाच्या लढाईत एक सैनिक म्हणून आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे असे प्रतिपादन त्यांनी निवेदनातून केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular