Thursday, March 28, 2024
Homeवर्धामोबाईल कंपनीकडून ग्राहकाची गळचेपी, टॉवर मधील सर्व्हिस केली बंद

मोबाईल कंपनीकडून ग्राहकाची गळचेपी, टॉवर मधील सर्व्हिस केली बंद

वर्धा ; मासोद गावात तीन टावर उभी आहेत, मात्र त्यातील मोबाईल ग्राहकांची सेवा बंद केल्याने ग्राहकांनी घेतलेली सिम कार्ड निरूपयोगी ठरत आहे .त्यामुळे परिसरातील हजारो नागगीकानी वेगवेगळ्या कंपनीचे घेतलेले सिम कार्ड करायचे काय असा प्रश्न पडला आहे .

मासोद येथे तीन वेगवेगळया कपंणीचे टॉवर बांधण्यात आले , आता नुस्ती शोभेची झाली आहेत, जेव्हा टावर उभी झालीत तेव्हा कंपनीने एजंट मार्फत जबरदस्त प्रचार करून मासोद आणी आजुबाजू च्या गावात वडाफोन आयडिया एअरटेल ची सिम घ्यायला लावली, पण आज गेल्या वर्षभऱ्यापासुन एक ही टावर चालू स्थितीत नाही परिणाम लोकांची सिम वाया गेली आहे . यापेकी कोणत्याही कंपनीची रेंज मिळत नसल्याने सामान्य जनते सोबत फसवणूक झाली आहे.
तसेच ज्या शेतकर्याच्या शेतात ही टॉवर उभी आहेत त्याना गेल्या दोन वर्षा पासुन भाडे सुद्धा दिलेले नाही,
त्यामुळे कंपनीकडून शेतकऱ्यांसह ग्राहकांची फसगत झाल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रीया

कंपनी ने टावर मधिल यंत्रसामुग्री काढूण घेतली. परिसरात पाहिजे तेवढी सिम संख्या झाली नाही त्यामूळे कंपनी घाट्यात आली म्हणून आम्हाला वरुन आदेश आहे की, टॉवर बंद करायचे.

  • राजूजी सिराम सरपंच मासोद ग्रा.प.

गेल्या दोन वर्षापासून भाडे मिळाले नाहीत तसेच यंत्र जरी काढले टॉवर अजुन उभे आहेत त्या खालची जमीन वाहता येत नाही तसेच आम्हाला कोणतीही सुचना केली नाही. वास्तविक कंपनी ने दर तीन महिन्यानी भाडे देऊ कबूल केले होते. आधीचे काही महिने दिले सुद्धा, तसेच कोणा सोबत संपर्क करायचा असली व्यक्ति किवा कंपनी कार्यालयाचा अधिकृत पता देत नाही तर दाद मागायची कुणा कडे

  • शेतकरी
    श्री चन्द्रशेखर अवस्थी,

या संबधी गावकऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता
उत्तर मिळाले की संबधित विषय आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही त्यामुळे मासोद लादगड डबलीपूर सहेली ससून्द चे नागरिक मानसिक विवचंनेत सापडले दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular