Thursday, March 28, 2024
Homeवर्धामासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह साजरा

मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह साजरा

हिंगणघाट

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
वर्धा व शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्यात आला.

मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. एस सी ई आर टी पुणे यांच्याद्वारे जागतिक पर्यावरण दिनापर्यंत हा मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,वर्धा व शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वेबिणार च्या सहा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून मुली व महिलांनी बदलत्या काळानुसार भविष्याची आवाहने सक्षमपणे पेलावी ही गरज लक्षात घेऊन वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते. मासिक पाळी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून तो दुर्लक्षित आहे,कारण याविषयी कमी बोलल्या जातं या विषयावर मोकळेपणाने बोलल जावे, मासिक पाळी बद्दल असलेले गैरसमज,अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, किशोरवयीन मुलींच्या जीवनातील या टप्प्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून एकही मुलगी शिक्षण प्रवाहातून दूर जाणार नाही व या दिवसांमध्ये ती शाळेमध्ये अनुपस्थित राहणार नाही,तसेच मासिक पाळीच्या केवळ येण्याने नव्हे तर तिच्या जाण्याने सुद्धा स्त्रीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होत असते. सर्व बाबींचे शास्त्रशुद्ध ज्ञान व्हावे, मासिक पाळी हा विषय केवळ स्त्रियांन पुरताच मर्यादित न राहता तो पुरुषांनी देखील तितक्याच आत्मीयतेने समजून घ्यावा, कारण प्रत्येक पुरुषाला आई, पत्नी व मुलगी असतेच. प्रत्येक घरांमध्ये स्त्री ही असतेच. त्या स्त्रीला या पाच दिवसांमध्ये घरांमध्ये योग्य वागणूक व सहकार्य मिळावे, तसेच तिच्या नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तिला समजून घेतल्या जावे , अशा अनेक मुद्द्यांवर विस्तृत प्रकाश टाकण्याकरीता या वेबिनार चे आयोजन डॉ.मंगेश घोगरे,प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा,तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांच्या प्रेरणेने करण्यात आले.या वेबिनार च्या माध्यमातून सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेने मासिक पाळी विषयी जनजागृती करून किशोर वयीन मुलींना मासिक पाळी व माझे आरोग्य या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती देण्यात यावी असे आवाहन प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे यांनी केले. तसेच या वेबिनार चे आयोजन व संयोजन मधुमती सांगळे,अधिव्याख्याता डायट वर्धा यांनी केले.
डॉ.देवानंद सावरकर,समता कक्ष प्रमुख डायट वर्धा,रत्नमाला खडके ज्येष्ठ अधिव्याख्याता,रेखा महाजन ज्येष्ठ अधिव्याख्याता, मंजुषा औंडेकर ज्येष्ठ अधिव्याख्याता,अपर्णा शंकरदरवार अधिव्याख्याता, दीपाली बसोळे अधिव्याख्याता , शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा तसेच संजय मेहेर उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वर्धा,अशोक कोडापे गटशिक्षणाधिकारी हिंगणघाट यांनी प्रशिक्षणाला मार्गदर्शन तसेच सहकार्य केले.
संगीता पेठे, विषय साधन व्यक्ती पंचायत समिती हिंगणघाट,शिल्पा धमाने विषय साधन व्यक्ती पंचायत समिती सेलू,वंदना चाफले विषय शिक्षिका अडेगाव पंचायत समिती देवळी,डॉ.मनीषा नासरे जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांनी तज्ञ मार्गदर्शक तथा सुलभका चे कार्य केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेकरिता सर्व पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,विषय साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक यांनी सहाही सत्राला पूर्णवेळ उपस्थिती राहून वेबिनार च्या यशस्वितेकरिता सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular