Friday, March 29, 2024
Homeवर्धामांडगावत सशस्त्र दरोडा साडे सात लाख रोख व ऐवज लंपास

मांडगावत सशस्त्र दरोडा साडे सात लाख रोख व ऐवज लंपास

महादेव पिसे यांना लघुशंकेसाठी जाणे आले अलगट

मुलाच्या लग्नकरिता केली होती जमवाजमव

पोलिसाकडून चोरट्यांचा शोध सुरु

समुद्रपुर:-
तालुक्यातील मांडगावात घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाब्या ताब्यात घेत ७ लाख ५० हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिने लंपास करीत सशस्त्र दरोडा टाकला. शुक्रवारी ८ जानेवारीच्या मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.


माडगाव येथील महादेवराव यादवराव पिसे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून कपाटाच्या चाब्या हिसकावल्या. दरम्यान कपाटात ठेवलेले चार लाख रुपये रोख आणि साडेतीन तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.घटनेप्रसंगी महादेव पिसे घाबरून बेशुद्ध पलंगावर पडले. एका तासानंतर त्यांना शुद्धी आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती आपल्या घरच्या सदस्यांना दिली.दरम्यान शेजाऱ्यांच्या आणि पोलिस पाटलाच्या मदतीने हिंगणघाट पोलिसांना घटनेची माहिती दिली. महादेव पिसे अल्पभूधारक शेतकरी आहे. यांना विकास आणि आकाश दोन मुलं आहे दोन्हीही मुलं जामच्या पीव्ही टेक्स्टाईलमध्ये काम करतात. लहान मुलगा आकाशचे लग्न २८ जानेवारीला असल्याने लग्नासाठी खरेदी व अन्य आवश्यक कामासाठी महादेवराव पिसे यांनी बँकेतून व शेतमाल विकून एकूण चार लाख पन्नास हजार रुपये रोख जमा करून ते कपाटात ठेवले होते. तर तिन लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचा समावेश होता. रात्री दिड वासताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे घराजवळ लपून बसून होते महादेवराव लघुशंकेसाठी घराच्या मागच्या दारातून निघताच संधीचा फायदा घेऊन दोन्ही चोरटे घरात घुसले दरम्यान महादेवराव घरात आल्यावर तोंडावर मास्क बांधून असलेल्या दोन चोरट्यां पैकी एकाने चाकू काढून महादेवराव यांच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाबीची मागणी केली. चाबी न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. चाकूच्या धाकाने चाबी हस्तगत करून दुसऱ्या चोरट्याने कपाटात असलेले चार लाख पन्नास हजार रुपये व तिन लाख सोन्याचे दागिने हे सर्व बॅगमध्ये भरून जवळपास अर्ध्या तासात चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.
विशेष म्हणजे त्यांच्या आवाजामुळे व चाकू पाहून महादेवरावने आपली शुद्ध हरवली होती ते बेशुद्ध होऊन पलंगावर पडून होते जवळपास एका तासानंतर त्यांना शुद्धी आल्यावर त्यांनी या घटनेबद्दल आपल्या घरच्या लोकांना या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर आजूबाजूला व पोलिस पाटलाच्या मदतीने हिंगणघाट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली घटनेच्या वेळी यादवराव एक मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. पोलिसांनी या घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच घटनेच्या तपासासाठी वर्धे वरून ठसे तज्ञ व इतर विशेष तज्ञ यांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले आहे. यासंबंधात पोलीस तपासाची प्रक्रिया सुरू होती या घटनेमुळे माडगाव गावात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे ठाणेदार संपत चव्हाण व वर्धे वरून व वरिष्ठ पोलीस अधिकारी बीट जमादार संदीप मेंढे, नितीन तोडासे घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेबद्दल हिंगणघाट पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस पथक करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular