Thursday, March 28, 2024
Homeवर्धामंदिरातल्या दान पेट्या फोडून चोरी करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

मंदिरातल्या दान पेट्या फोडून चोरी करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

दोन मंदिरात केली होती चोरी

डीबी पथकाची कारवाई

हिंगणघाट मंदिरातल्या दानपेटी फोडून चोरी करणारा चोरट्याला हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील डि बी पथकाच्या कारवाईत पकडण्यात आले.अज्ञात चोरट्याने गौतम वॉर्ड हिंगणघाट येथील दान पेटी चे कुलूप तोडून पाच ते सहा हजार रुपये चोरून नेले अशी तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती,तसेच हिंगणघाट शहरात यापूर्वीसुद्धा मंदिरात दानपेटी फोडून चोरी करण्यात आली होती याचे सुध्दा हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सतत होणाऱ्या मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याचे डी बी पथक आरोपीला शोध घेण्यास सुरुवात केली,शोध घेत असता आपले मूखबीर लावून आरोपी अमोल प्रभाकर पुलकटवार वय २८ राहणार सेंट्रल वॉर्ड हिंगणघाट याला अटक करण्यात आली व आरोपीचा घराच्या पाहणी केली असता मंदिरातून दानपेटी फोडून चोरलेले चिल्लर व पैशाचे नोटा अशी रक्कम जप्त करण्यात आली,त्यांची विचारपूस केली असता त्याने याआधी सुद्धा महाराणी दुर्गावती समाज मंदिर येथील दानपेटीतील मंदिरातून चोरी केल्याची कबुली दिली. अशि दोन मंदिरात केलेली चोरी आरोपीने कबुली दिल्यानंतर हनुमान मंदिर येथील दानपेटी व महाराणी दुर्गावती समाज मंदिर येथील दानपेटी फोडल्याचे दोन्ही गुन्हे उघडकीस करण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, हिंगणघाट पोलिस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाचे शेखर डोंगरे, विशाल बंगाले, निलेश तेलरांधे, सचिन घेवंडे, सचिन भालशंकर यांनी केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular