Friday, March 29, 2024
Homeवर्धाभाजप महिला मोर्चाचे तहसीलदार यांना निवेदन

भाजप महिला मोर्चाचे तहसीलदार यांना निवेदन

हिंगणघाट ; महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहे. नूकतेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा लैंगिक अत्याचार विरोधात एफ आय आर दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये गेली असता, पोलीस स्टेशनने तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली.

म्हणून वरील महिलेने मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिले, परंतु आजपर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला नाही असा आरोप करीत भाजप महिला आघाडीने तहसीलदार यांना निवेदन दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर वाढत्या अत्याचारमूळे सर्व सामान्य नागरिकांचे जीवन जगणे अडचणीचे झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आरोग्य व्यवस्था व विधुत यंत्राने मधील गलथान कारभारामुळे बालकांचा मृत्यू झाला. याला आरोग्य मंत्री जबाबदार आहे.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ची कबुली देत दोन अपत्य असल्याची कबुली दिली. निवडणूक प्रतिज्ञा पत्रात तीनच अपत्य असल्याचे दाखवून महाराष्ट्रतिल जनतेला मूर्ख बनविले या सर्व बाबींचा निषेध निवेदनात करण्यात आला. निवेदन देते वेळेस शहर अध्यक्ष अनिता माळवे न. प. बांधकाम सभापती छाया सातपुते, महिला व बालविकास सभापती शारदा पटेल, वैशाली पलांडे ,सारिका उभाटे व सर्व नगरसेविका व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular