Thursday, March 28, 2024
Homeवर्धाभविष्यात जनतेला त्रासदायक ठरणारी कामे खपवून घेणार नाही - आमदार दादाराव केचे

भविष्यात जनतेला त्रासदायक ठरणारी कामे खपवून घेणार नाही – आमदार दादाराव केचे

आर्वी : विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी येथील अतिथी गृहात कौंडण्यपूर – आर्वी रामा. २९४ या प्रगतीपथावर असलेल्या कामाचा आढावा वैद्य मॅडम कार्यकारी अभियंता साबांवि अमरावती, चाफले निवासी अभियंता, सिंग व्यवस्थापक वेलसिन कंपनी, नितेश सनके एसआयपीएल, पी. राऊत कनिष्ठ अभियंता यांच्याकडून झालेल्या बैठकीत घेत प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून वस्तुस्थितीची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली.

आमदार दादाराव केचे यांनी या रस्त्यालगतच्या नाल्यांचे बांधकाम नियमबाह्य होत असुन या कामाबाबत प्राप्त तक्रारी व स्वतः केलेल्या पाहणी दरम्यान भरपावसात सिमेंट कॉक्रिट चे काम सरळ खोदकाम केल्यानंतर लागलेल्या मातीवर मातीची दबाई व मुरूमची लेयर न देता करण्यात आल्याचे दिसून आले होते. याबाबत रितसर संबंधितांकडे तक्रारी करून कामबंद करण्याचे निर्देश दिले होते तरी ठेकेदाराकडून काम बंद न करण्यात आले नाही. या बाबत आमदर दादाराव केचे यांनी कौंडण्यपूर – आर्वी रस्त्यालगतच्या नाल्यांचे काम व विधानसभेत सुरू असलेल्या इतर रस्त्या लगतच्या नाल्यांचे कामामध्ये बरीच तफावत का आहे याची विचारणा केली असता असे समजले की, कौंडण्यपूर – आर्वी रस्त्याच्या लगतच्या नाल्यांच्या बांधकामा संदर्भात मंजूर प्राकलन मध्ये आवश्यक बाबी निधी अभावी टाळल्या असल्याचे कळले. करीता नाल्याचे झालेले काम फोडून नव्याने नियमाकुल बांधकामासाठी आवश्यक बाबींचा समावेश प्राकलात करून घेण्यासाठी शासकीय पातळीवर कागदपत्रांची पूर्तता करावी असे निर्देश आमदार दादाराव केचे यांनी दिले.

तसेच कौंडण्यपूर पासून आर्वीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे समसमान अंतर ठेवावे व पॉलिटेक्निक कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत असलेल्या रस्त्या दरम्यान दुतर्फा पथदिवे लावण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.

बैठकीनंतर काम सुरू असलेल्या स्थळी अधिकाऱ्यांनासोबत घेऊन प्रत्यक्ष भविष्यात धोकादायक ठरणारी नाल्यांचे बांधकामाची पाहणी केली. भरपावसात काम केल्या गेल्याने कामाची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश देत जरी १० वर्षाची हमी या रस्त्याची असली तरी सुरवातीलाच कामाच्या गुणवत्तेवर काळजी घेतली तर भविष्यात संभाव्य धोका टाळला जाऊ शकतो असे आमदार दादाराव केचे यांनी अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular