Saturday, April 20, 2024
Homeवर्धाबोंडसुला येथिल युवा मित्र परीवाराचे वतीने छत्रपतीे शिवाजी महाराज जयंती साजरी.

बोंडसुला येथिल युवा मित्र परीवाराचे वतीने छत्रपतीे शिवाजी महाराज जयंती साजरी.

सेलू:-तालुक्यातील बोंडसुला येथिल युवा मित्र परीवाराचे वतिने जानता राजा श्रीमंत योगी.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुक्रवार दि.१९ रोजी सायंकाळी कोरोना संक्रमणा मुळे अत्यंत साधेपणाने चाफले निवास मध्ये साजरी करण्यात आली.


प्रथम येथील युवा मित्र परीवाराचे अध्यक्ष प्रविण चाफले यांनी शिवाजी महाराज यांचे तैलचित्राचे पुजन हारार्पन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.युवा मित्र परीवाराचे युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून शिवरायांचे आठवावे रूप .शिवरायांचा आठवावा प्रताप या विषयावर समायोजित विचार व्यक्त केले.जय भवानी. जय शिवाजी च्या जयघोषात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या वेळी स्नेहा चाफले, सुरज जिकार, अनूप चाफले, सुमित आवारी, आरती चाफले, गौरव महाजन, आकाश चाफले, अनूश जरोदे, गजानन पुरी, अथर्व झीटे, सानिया पुरी व युवा मित्र परीवाराचे सदस्य उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular