Saturday, April 20, 2024
Homeवर्धापुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

हिंगणघाट:

स्त्री पुरोगामित्वाचा जागतिक दीपस्तंभ असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 296 वि जयंती धनगर समाज संघर्ष समिती व लोकमाता अहिल्याबाई होळकर समाज जागृती मंडळ शाखा हिंगणघाट यांच्या वतीने 31 मे रोजी संत तुकडोजी वार्ड येथील कलोडे सभागृह जवळच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक नियोजित स्थळी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला रमेशराव घोडे यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रजवलीत करून पिवळा ध्वज फडकविण्यात आला, व येळकोट येळकोट जय मल्हार चा जय घोष करण्यात आला, यावेळी अहिल्यादेवी प्रबोधन मंच चे जिल्हा अध्यक्ष यादवराव तुराळे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गणेश उगे, रमेशराव घोडे,डॉ.संदीप लोंढे कृष्णाजी शेंडगे विजय उगे हेमराज हुलके देविदास ढोकने छत्रपती रोकडे प्रशांत निखाडे प्रवीण घुरडे वासुदेव पडवे स्नेहल चिडे प्रशांत नंनोरे नरेश येडे दत्तू घोडे केतन गायनार मेहर उगे यांची उपस्थिती होती, स्त्रीपुरोगामीत्वाचा जगतिक दीपसतंभ असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर
यांनी त्याकाळच्या पुरुषप्रधान संस्कृतीतून स्त्रियांवर अनेक बंधने टाकली जात होती केवळ कुटुंबावरच नाही तर जगावर राज्य करण्याची क्षमता असलेली स्त्री बंदिस्त जीवन जगत होती, याचा कळस गाठला गेला तो मध्ययुगात. भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांचे जीवन संकुचित करणाऱ्या परंपरा,धारणा, प्रथा विकसित झाल्या होत्या. त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या कर्तुत्वाच्या क्षमताच जगासमोर मांडता येत नव्हत्या स्त्री काय करू शकते याचा अंदाज सुद्धा ती करू शकत नव्हती कारण तिची वैचारिक ठेवण संस्काराच्या नावावर इतकी संकुचित केली जात होती की, ती स्वतःच्या क्षमताच विसरून जात होती… अधिकार शुन्य, भावना शुन्य, विचार शुन्य होऊन इशाऱ्यावर जगणारा प्राणी या रुपाने जीवन घालवत होती.
याला छेद स्वतःच्या जीवनापासून देत सामाजिक क्रांतीचं प्रथम पाऊल राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी टाकलं. आपल्या शूरवीर पती खंडेराव यांच्या कुंभेरीच्या रनातील मृत्यूनंतर सती न जाता तत्कालीन धर्ममार्तंडांचा विरोध पत्करला. सामाजिक निर्भत्सना, स्वकीय आणि परकीय यांच्या कडून होणारा धिक्कार सहन केला. जणू काही स्त्रियांच्या गुलाममुक्तीचा जाहीरनामा स्वतःच्या जगण्यातून अमलात आणला.
स्त्रियांच्या मनगटातील बळ जाणारे पुरोगामी विचारांचे कर्तबगार सासऱे तथा मराठेशाहीतील जेष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर यांनी निर्माण केलेल्या इंदोर राज्याचा आधारस्तंभ अहिल्याबाई बनल्या. जनकल्याणाच्या दृष्टीने समाज निर्मितीसाठी राज्याची सत्ता स्वतःच्या हातात घेतली. राजसत्तेचा विश्वस्त या नात्याने सत्तेचा वापर केला. मला मिळालेली राजसत्ता कल्याणासाठी वापरायची असून यासंबंधीचा जवाब मला ईश्वराप्रती द्यायचा आहे, हा दृष्टी भाव त्यांनी अखंड जीवनामध्ये आत्मसात केला होता.
त्यांनी राजसत्तेचा वापर स्त्री सुद्धा करु शकते, हे दाखवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने पुरोगामित्वाचा वसा घेऊन प्रतिगामी व्यवस्थेला लाथ मारली. सलग 28 वर्षे राज्यकारभार केला. त्या अठ्ठावीस वर्षात धर्मसत्ता, राजसत्ता व अर्थसत्ता यांना दैविक, धार्मिक नाही तर आध्यात्मिक अधिष्ठान देऊन सर्व सत्तांचा वापर जनकल्याणासाठी कशा प्रकारे केला जाऊ शकतो, याचा एकमेव आदर्श भारतीय भूमीतून जगासमोर घातला. त्यामुळेच त्यांची तुलना केवळ रशियाची राणी कथरिना व इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्याशी केली जावू शकते..
जनकल्याणाचे कार्य, परधर्म सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, समाज कल्याण, प्राणीमात्रांवर दया, भुकेल्याला अन्न, समृद्ध शेती, जलद व सुलभ न्याय, वंचित उपेक्षितांना अभय, निर्धनां पासून धनवाना पर्यंत सर्वांनाच जगण्याचा अधिकार, वाटसरूंना व व्यापाऱ्यांना लुटारू पासून अभय, त्यांच्यासाठी सोयी सुविधा हे सर्व लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 28 वर्षातील राज्यकारभाराचं वैशिष्ट्य असल्याचे लक्षात येते.
जगाच्या पाठीवर महिलांची फौज निर्माण करणारी राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख केला
अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये दुःखाची शृंखला दिसून येते तेवढी क्वचितच इतरांच्या जीवनामध्ये आलेली असेल.
शूरवीर पती खंडेराव, पितृतुल्य सासरे सुभेदार मल्हारराव, सासू गौतमाबाई, मुलगा, जावई, मुलगी, नातू अशी पाठोपाठ रक्त नात्यातील स्वकीय माणसांच्या मृत्यूची शृंखला अहिल्याबाईनी अनुभवली. त्या सर्वांच दुःख पदरात घालून हा देह जनकल्याणासाठी वापरायचा, या एकाच ध्येयाने त्या श्वास घेत राहिल्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular