Thursday, April 25, 2024
Homeवर्धापाळूया थोडी शिस्त…

पाळूया थोडी शिस्त…

मनिष गांधी समुद्रपूर
कोरोणाचा फैलाव दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागासह शहरांमध्ये झाला. शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त होते. याला सण,नेत्यांचे दौरे,लग्न हे सारे कारणीभुत आहे.हे एक सामूदायिक बेफिकीरीमधून दुसऱ्या लाटेच्या काळात प्रामुख्याने जाणवत आहे. यामुळे सरकारलाही निर्बघासारखे उपाय योजावे लागत आहेत.त्याविरुद्धची ओरड चुकीची नसली तरी थोडी शिस्त पाळली तर कोरोणाचा फैलाव,त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आणि पर्याय आणि कठोर निर्बंधाची पावले हे सारखे टाळता येण्यासारखे आहे.


कोरोना विषाणूची जोरदार लाट आमच्या देशात सुरू आहे.पहिली लाट येऊन गेली, दुसरी चालू आहे आणि तिथली येऊ घातलीय. दुसर्‍या लाटेमध्ये देशा,राज्य अव्वल जिल्हाअव्वल तर आपले शहर देखील अव्वल:पण दुसऱ्या कोरोना माणसाच्या अंगवळणी पडलेला दिसतोय.झगडतोय दैनिक व्यवहारासाठी पहिल्या लाटेच्या अनुभवावरून भीति गेली की बेपरवाई आली तोडकीमोडकी का होईना लस आली आहे की,त्या लसीच्या जीवावर बिनधास्त झालोय:पण पहिल्या लाटे सारखी कोरोणाची दहशत राहिली नाही.हे मात्र खरे रोज मिळणारी शेकडो-हजारो पेशंट जाणारी माणसे दवाखान्यात न मिळणारे बेड लाखो हजारोचे बिले औषधे अंत्यविधीसाठी नंबरमध्ये असणारे मृतदेह हे दिसत असूनदेखील घरी राहा, स्वस्त यासारखी सरकारी आवाहाने विसरून लोकांनी कोरोणाच्या विळख्याला फाट्यावर मारलं की,कोरोणाच्या दहशतीकडे लोकांनी दुर्लक्ष केलय पण दुसरी लाट भयानक असूनदेखील काही तास शासनाने दिलेल्या सवलतीचा लोक गैरफायदा घेत आहेत म्हणजे तिसऱ्या लाटेला आमत्रंन देत आहेत.
खरंतर माणसाच्या दहशतीला माणूस घाबरतात पुरणाची पहिली लाट आली ती आवडण्यासाठी पंतप्रधानांनी लोक डाऊन जाहीर केले घरात बसून लोकांनी दिवे लावले टाळ्या वाजवल्या त्यादेखील लॉजिक होतं गोरगरिबांना सहा महिने धान्य फुकट मिळालं गावागावात मदतीचे हात पुढे आले.आपल्या शहरातील उदाहरण आपल्यालाच माहिती आहे अनुभवला आहे.
त्यावेळी एक पेशंट मिळाला आणि अवघे शहर पोलिसांनी सिल केलं ठिकठिकाणी चौक्या बसविल्या चुकून देखील कोणी बाहेर फिरताना दिसत नव्हतं.जणूकाही कोरोनाच माणसांना शोधतोय,अशी परिस्थिती सर्वत्र शुकशुकाट त्यामुळे आपल्याकडे रोगी नव्हते.आता रोगी नाही अशी परिस्थिती नाही माणसे पटापट मरत आहेत. तरी देखील लोक बेजबाबदारपणे वागत असून दुसऱ्या .लाटेचा अनुभव घेउन सुद्धा तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे.तरी लोकांनी शिस्त पाळली तर आपण कोरोणाला हरवू शकतो.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular