Friday, April 19, 2024
Homeवर्धापत्नी च्या मृत्यू नंतर पती चाही मृत्यू

पत्नी च्या मृत्यू नंतर पती चाही मृत्यू


मुलाच्या लग्ना अगोदर आई वडिलांच्या मृत्यू ने मुलं।ना दुःख
24 मे ला होणार होते लग्न
तालुका प्रतिनिधी
समुद्रपूर


कुटुंबात मोठ्या मुलाचे लग्न ठरले साखरपुडा झाला 24 मे ला लग्न होणार होते त्या अगोदर मुलाच्या आईचा व वडिलांचा मृत्यू झाल्याने तीन मुलाना धक्का बसला आहे सदर घटना तालुक्यातील जाम येथील त्रिमूर्ती कन्ट्रक्शन चे संचालक वासुदेवराव बुरीले यांचे कुटूंबा त घडली
वासुदेवराव बुरीले यांना तीन मुले हर्षल ,कुणाल,शुभम त्यांनी हर्षल चे नागपूर ची मुलगी पाहून लग्न निश्चित केले साखरपुडा सुद्धा झाला कुटुंबा मध्ये आंनदाचे वातावरण पसरले होते लग्नाची 24 मे ही तारीख सुद्धा निश्चित झाली आई पुष्पाबाई चे लग्नाची खरेदी सुरू झाली जवळच्या नातेवाईक म्हणून खरेदी साठी पुष्पाबाई च्या दोन बहिणी सत्यभामा व शिलाबाई या सुद्धा सोबत यायच्या यातच कुणाला तरी बाधा झाली आणि या सर्व आनंद।वर शोककळा पसरणे सुरू झाले आई पुष्पाताई वासुदेवराव बुरीले यांची तब्बेत बिघडली त्यांना सावंगी येथे उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचाराला दाद न देता 27 एप्रिल ला मृत्यू झाला व सर्व आनंदावर विरजण पडले तोच त्यांना दुसरा धक्का बसला तो मावशी सत्यभामा महाकळकर रा सुमठाण। यांचा 22 एप्रिल ला मृत्यु झाला तर पुन्हा तिसरा धक्का 3 मे ला दुसरी मावशी च्या मृत्यू ने बसला शिलाबाई डोने रा जाम यांचा सेवाग्राम येथे मृत्यू झाला या सर्व धक्का तुन सावरत नाही तर वडील वासुदेवराव बुरीले यांचे 23 मे रोजी नागपूर येते उपचारा दरम्यान निधन झाले
हर्षल चे 24 मे ला होणाऱ्या लग्नाच्या अगोदर च त्यावर दुःखाचे सावट पसरले त्यामुळे वासुदेवराव चे तिन्ही मुले हर्षल कुणाल व शुभम ला जबरदस्त धक्का बसला आहे तर जाम येथील व्यवसायिक धनराज डांगरे वासुदेवराव बुरीले यांचे साळे यांच्या तीन बहिणी व भाऊजी गेल्याने त्यांना सुद्धा दुःख झाले आहे सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Previous article
Next article
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular