Friday, April 19, 2024
Homeवर्धाना यशाचे कौतुक, ना निकालाची हूरहूर

ना यशाचे कौतुक, ना निकालाची हूरहूर


दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याचा यंदा अपेक्षाभंग
मानिष गांधी समुद्रपूर
दहावी आणि बारावीचे परीक्षा देण्याचा अनुभव वेगळाच तो असतो. परीक्षा दिल्यानंतर निकालाची उत्सुकता असते.यश मिळाल्यानंतर आप्तेनातेवाइकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.यंदा कोरोणामुळे या कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेता आला नाही.वर्षभर अभ्यास केला पण परीक्षा झाल्या नाहीत,बारावीला नसतो तर बरं झालं असतं,अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या
दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा ठरतात.त्यामुळे शालेय जीवनात या दोन्ही इयत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असते.वर्षभर अभ्यास केल्यानंतर शाळा महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांचा निरोप दिला जातो. निरोप समारंभाचे आठवणी मुले आयुष्यभर जपून ठेवतात.मात्र यंदा कोरोणामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अशा सुवर्णक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.वर्षभर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी घरी राहून ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास केला मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाली.त्यामुळे यशाचे कौतुक करणारे कोणी नाही.शाळा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्यानंतर सहकारी मित्राचा किलबिलाट,क्लासला दांडी मारून बाहेर खेळणे,चित्रपट पाहणे, मैदानावर मित्रांसोबत विविध खेळ खेळणे मित्राच्या खोड्या काढणे असे अनेक निरागस अनुभव यंदा विद्यार्थ्यांना घेता आला नाही,ही खंत आयुष्यभर राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
निरोप समारंभ म्हणजे सुवर्णक्षण
शाळा महाविद्यालय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यासाठी निरोप समारंभ आयोजित करतात.या प्राथमिक शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला जातो.हा समारंभ विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जातो. शाळा शिक्षक मित्राची ताटातून आनंदाचे क्षण विद्यार्थ्याचा उत्सव आपण मोठे झाल्याची जाणीव या समारंभातून विद्यार्थ्यांना होतो.निरोप समारंभाचे सुवर्णक्षण विद्यार्थ्या आयुष्यातला जपून ठेवतात.


बोर्डातील परीक्षेत यश मिळाल्यानंतर आई-वडील, नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो.पास झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद आई-वडिलांना होतो हा घरातील आनंद सोहळाच असतो.मात्र यंदा परीक्षा रद्द झाल्याने निकालाची उत्सुकता नाही.त्यामुळे कौतुकाची थाप देणारी कोणीच नाही.वर्षभर अभ्यास केला पण परीक्षा झाली नाही त्यामुळे उत्सुकता नाही.
ऋतिका अनिल साळवे विद्यार्थिनी दहावी
पाचवीपासून वाटायचे आपण बारावीला गेलो की आमचाही निरोप समारंभ थाटात होईल सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येऊन निरोप समारंभ उत्सव कसा साजरा करू पण पुरोगामी निरोप समारंभ अपेक्षाभंग झाल्या आहे
करण झाडे विद्यार्थी १२ वी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular