Thursday, April 25, 2024
Homeवर्धानव्या संचार बंदी बाबत आढावा सभा

नव्या संचार बंदी बाबत आढावा सभा

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

महाराष्ट्र शासनाने 18 मे ते 1 जून पर्यंत संचार बंदी लागू केली. या संचार बंदित नियमाचे उल्लंघन न होता, नागरिकांना ही सुविधा मिळाली पाहिजे या संबधी आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी सभेचे आयोजन केले. नगरपालिकेच्या नवीन इमारतीत घेण्यात आलेल्या सभेत नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तहसीलदार श्रीराम मुंदडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ कीर्ती दिघे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.


या सभेत उपस्थित व्यापारी संघाच्या सदस्य कडून काही समस्या मांडण्यात आल्या त्यात नियमाचे पालन करण्यात येईल असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण किराणा अनाज दुकानाचे अर्धे शटर खोलून तुम्ही होम डिलेव्हरी देऊ शकता. त्याकरिता आपणास दुकानाचे लायसन्स, आधार कार्ड, कोरोना चाचणी अहवालाची प्रत याची पूर्तता केल्यानंतरच व्यापाऱ्यांना होम डिलवरी करिता आय कार्ड देण्यात येईल. होम डिलिव्हरी करते वेळी कोरोणा चाचणी अहवालाची प्रत सोबत असणे आवश्यक आहे.
अंडे. मटन. कोंबडी. मासे .पीठ गिरणी तसेच खाद्यपदार्थांची दुकाने सोमवार /बुधवार/ शुक्रवार या दिवशी तर भाजीपाला विक्रेते यांची दुकाने मंगळवार /गुरुवार/शनिवार या दिवशी घरपोच सेवा करीता सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत दुकान अर्ध शटर उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
कोणत्याही परिस्थितीत ग्राहक दुकानात दिसणार नाही याची हमी दुकानदारांना घेणे आवश्यक आहे. ग्राहक दुकानात दिसेल तर दंड आकारण्यात येईल.
सभेत सर्वच व्यापाऱ्यांची चर्चा करून थोडाफार तोडगा काढण्यात आलेला आहे.
तसेच हार्डवेअर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून शेती उपयोगी साहित्याची घरपोच डिलिव्हरी करिता परवानगी कार्ड घेण्याची सूचना करण्यात आली. तसेच सिमेंट वाळू व घर बांधकामाची साहीत्य घरपोच देण्याकरिता जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली.
शासनाच्या नियमाने किराणा दुकाने 15 दिवस बंद ठेवू शकणार नाही. जी दुकाने पूर्ण पंधरा दिवस बंद राहील, अश्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याच्या सूचना सुद्धा या सभेत उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular