Thursday, March 28, 2024
Homeवर्धानगरपंचायत समुद्रपूर येथे लसीकरण केंद्र सुरू

नगरपंचायत समुद्रपूर येथे लसीकरण केंद्र सुरू


आमदार कुणावार यांचे प्रयत्न।ला यश

तालुका प्रतिनिधी
समुद्रपूर
समुद्रपूर शहरातील सर्व नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात लस मिळण्या करिता गर्दी होत असल्याने सदर लसीकरण नगरपंचायत मध्ये सुरू करावे अशी आमदार समीर कुणावार यांनी केली होती त्यानुसार आज नगरपंचायत मध्ये लसीकरण ला सुरुवात करण्यात आली.


स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरू होते मात्र सदर ठिकाणी लसीकरण, टेस्टिंग, व ओपडी सुरू असल्याने मोठय। प्रमाणात गर्दी होत होती व सामाजिक अंतर सुद्धा पाळल्या जात नव्हते तेव्हा सदर बाब कोरोना आढावा बैठकीत आमदार समीर कुणावार यांनी वैदकीय अधीक्षक डॉ कल्पना मैस्कर यांचे निदर्शनात आणून सदर लसीकरण केंद्र नगर पंचायत समुद्रपुर सुरू करावे अश्या सूचना करण्यात आल्या त्या नुसार समुद्रपूर शहरातील नागरिकांसाठी नगरपंचायत समुद्रपूर येथे लसीकरण सुविधा आज पासून तेव्हा …. ४५ वर्षा वरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्यात यावे.व दि 15 मे पासून 18 वर्ष वरील युवकांना लसीकरण सुरू होईल असे या वेळी सांगण्यात आले
या वेळी आमदार समीर कुणावर, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी धुमाळे वैद्यकीय अधिकारी डॉ नरवाडे परिचारिका सुषमा पाठसबे उपस्थित होते..तसेच आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular